AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिरूरचे भावी खासदार म्हणून आमदार महेश लांडगेच्या नावाची चर्चा ; जाणून नेमके काय घडले

जनतेचे पाठबळ, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पक्षाने विश्वास दाखवत संधी दिली तर खासदारकीची निवडणूक लढवू - महेश लांडगे

शिरूरचे भावी खासदार म्हणून आमदार महेश लांडगेच्या नावाची चर्चा ; जाणून नेमके काय घडले
MLA Mahesh landge
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 12:47 PM
Share

पिंपरी – लोकसभा निवडणुकीसाठी अजून दोनहून अधिक वर्षे बाकी आहेत. दुसरीकडं भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर संसदेचे फोटो , खासदार, असा उल्लेख आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे खासदारकीसाठी निवडणूक लढवणार आहेत का अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

शिरूर मतदारसंघात शिरूर हवेली , खेड, जुन्नर , हडपसर, भोसरीसहा आंबेगाव या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सद्यस्थितीला यातील पाच मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर भोसरीत महेश लांडगे भाजपचे आमदार आहेत. शिरूर मतदार संघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत.

पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार आमदार महेश लांडगे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले,  मी कुणालाही अश्या प्रकारचे बॅनर लावण्यास सांगितले नव्हते. हे सगळं कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. जनतेचे पाठबळ, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पक्षाने विश्वास दाखवत संधी दिली तर खासदारकीची निवडणूक लढवू असे मत महेश लांडगे  यांनी व्यक्त केले आहे.

भाजपाला मोठी ताकद २७ नोव्हेंबरला नुकताच वाढदिवस साजरा झाला. लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असूनही शिररमधील प्रत्येक गावामध्ये त्यांच्या वाढदिवसाची बॅनर बाजी करण्यात आली होती. यामध्ये भावी खासदार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. येत्या काळात स्थानिक निवडणुकांपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत आमदार महेश लांडगे यांच्या रूपाने भाजपालामोठी ताकद मिळणार आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वसईत आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? भाजपच्या सर्व खासदारांना व्हीप जारी

शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा.
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.