Dilip Walse Patil | बेकायदेशीररित्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन नको, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली की परवानगी देणार-  दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil | बेकायदेशीररित्या बैलगाडा शर्यतीचे  आयोजन नको,  कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली की परवानगी देणार-  दिलीप वळसे पाटील
आंदोलनामागे षडयंत्र- दिलीप वळसे-पाटील

कोरोचा वाढत्या रुग्ण संख्येमुळे बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली आहे. परिस्थिती निवाळली की पुन्हा शर्यतीला परवानगी दिली जाईल. त्यामुळे शर्यत प्रेमींनी बेकायदेशीर रित्या शर्यतीचे आयोजन करू नये

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 02, 2022 | 5:13 PM

पुणे – सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील लांडेवाडी येथे पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. मात्र शर्यतीसाठी अवघे काही तास राहिले असतानाच जिल्ह्याधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली होती . पण वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे ऐनवेळी शर्यत रद्द करण्यात आली. कोरोनाची वाढत असलेली रुग्णसंख्येमुळे शर्यतीवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात आली की बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दिली आहे.

बेकायदेशीररित्या आयोजन नको

कोरोचा वाढत्या रुग्ण संख्येमुळे बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली आहे. परिस्थिती निवाळली की पुन्हा शर्यतीला परवानगी दिली जाईल. त्यामुळे शर्यत प्रेमींनी बेकायदेशीर रित्या शर्यतीचे आयोजन करू नये असे त्यांनी म्हटले आहे. एवढच नव्हेतर सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अजून यायचा आहे, ही अंतरिम परवानगी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लांडेवाडीतील शर्यती रद्द झाल्यानंतर खेड येथे गनिमी काव्याने बैलगाडा शर्यती भरवण्यातआल्या होत्या या बैलगाडा शर्यतीत शंभरपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. बैलगाडा शौकीन आणि मालकांनी खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा या ठिकाणी या शर्यती छुप्या पद्धतीने भरवल्या होत्या. प्रशासनाने बैलगाडा शर्यत ऐनवेळी स्थगित केल्याने शर्यत आयोजक आणि बैलगाडा मालक आक्रमक झाल्याचे दिसून आले.

राजकारण केल्याचा आढळरावांचा आरोप

बैलगाडा शर्यतीला स्थगिती देण्यामागे राजकारण झाले आहे. कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असल्यामुळे शर्यतीला स्थगिती देण्यात आली आहे. बैल गाडा रद्द केल्या या संदर्भात मी मुख्यमंत्र्याशी बोलणारा आहे. एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते. मग शर्यतीला का नाही? असा प्रश्न शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासनाला केला आहे.

बैलगाडा प्रेमींनी घाटात केली ठिय्या आंदोलन अचानकपणे बैलगाडा शर्यत रद्द केल्याने , बैलगाडा प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या निर्णया विरोधात व निषेध कारण्यासासाठी घाटात ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनात शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव पाटीलही आंदोलनास बसले होते . आंदोलनातून जिल्हाप्रशासनाचा निषेध व्यक्त केला . जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी आम्हाला विश्वासात न घेता बैलगाडा शर्यतीच्या स्थगितीची नोटीस काढली याचा आम्ही निषेध करत आहोत, असेही आढळराव म्हणाले होते.

Hairloss | ‘चंद्रावर फूल उमलणार, टकल्यावर केस उगवणार!’ वैज्ञानिकांनी नेमका काय शोध लावला?

108MP कॅमेरा, डुअल सेल्फी कॅमरासह पहिला कलर चेंजिंग स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Babanrao Lonikar | ‘आरोग्य सुविधा वाढवली, असं म्हणणारे नेते खोटारडे’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें