वातावरण बदलामुळे पुणेकर आजारी; शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे (sudden changes in the climate) निम्म्याहून अधिक पुणेकरांना (Pune) आजारांनी ग्रासलं आहे. ताप (Fever), सर्दी (Cold), खोकला (Cough), न्यूमोनियासारख्या (Pneumonia)आजारांचे घराघरात रुग्ण सापडत आहेत.

वातावरण बदलामुळे पुणेकर आजारी; शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

पुणे : वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे (sudden changes in the climate) निम्म्याहून अधिक पुणेकरांना (Pune) आजारांनी ग्रासलं आहे. ताप (Fever), सर्दी (Cold), खोकला (Cough), न्यूमोनियासारख्या (Pneumonia)आजारांचे घराघरात रुग्ण सापडत आहेत. नेहमीच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठ्यांचीही दवाखान्यांमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. (Due to sudden changes in the climate, the number of patients suffering from fever, cold, cough and pneumonia has increased in Pune)

 वातावरण बदलल्यानं बिघडलं पुणेकरांचं आरोग्य

गेले दोन आठवडे पुण्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. या काळात शहरात कडक ऊन पडत होतं. पण गेल्या चार पाच दिवसांपासून शहरात सातत्याने ढगाळ वातावरण आहे. गार वारे सुटले आहेत. त्यामुळे हवेतली आर्द्रता वाढली आहे. यात हवेतल्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लहान मुलांसहित मोठ्या माणसांनाही आजारांनी ग्रासलं आहे. अनेकांना सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला अशी लक्षणं दिसत आहेत.

गोळ्या-औषधे घेऊनही ताप जाईना

सध्या पुण्यात व्हायरल फिव्हर, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. व्हायरल फिव्हरमध्ये अनेक रुग्णांना औषध-गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचं दिसतंय. इन्फ्लूएन्झामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसत आहेत. अनेकांचा ताप ५-६ दिवस जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे.

कोरोनामुळे भीतीचं वातावरण

वातावरणातल्या बदलांमुळे पुण्यात आजारांचं प्रमाण वाढलं आहे. पण नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणं सारखीच असल्याने नागरिक आणि लहान मुलांचे पालक घाबरून जात आहेत. रुग्णांचा ताप जात नसल्याने कोरोना आणि इतर काही लक्षण दिसतात का यांच्या चाचणी आणि तपासण्या करण्यात वाढ झाली आहे.

डॉक्टरांकडून वेगवेगळ्या तपासण्यांची सूचना

डॉक्टरांकडे गेल्यानंतर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगितलं जात आहे. यात रक्त, लघवी, कोरोनासह इतर चाचण्यांचा समावेश आहे. ज्यांना किरकोळ लक्षणं आहेत त्यांना गोळ्या-औषधांसोबत गरज वाटल्यास इंजेक्शनही दिलं जात आहे. व्हायरल फिव्हर, फ्लू, डायरिया, न्यूमोनिया ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य, 70 टक्के लशी राखीव, आज 195 ठिकाणी होणार लसीकरण

पुण्यात 70 लाख कोरोना लसीकरणाचा टप्पा पार; अजित पवारांकडून कोव्हिड-19 च्या परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

Pune Corona Report | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली, एका दिवसात नव्या 182 बाधितांची नोंद तर 6 मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI