AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | वीज चोरी करणे पडले महागात, महावितरणकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

Pune News | वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पुणे परिमंडळात वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे...

Pune News | वीज चोरी करणे पडले महागात, महावितरणकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
mahavitaranImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 9:40 AM
Share

पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : महावितरणकडून वीज चोरी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. पुणे परिमंडळात वीज चोरी करणाऱ्या ७६६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत महावितरणने २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वीज चोरी करणाऱ्यांना केला आहे. त्यातील ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी सुरु असलेली मोहीम कायमस्वरुपी राबण्यात येणार आहे. यामुळे वीज चोरी करू नका, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील इतर बातम्या

शिक्षकांवर कारवाईचा इशारा

निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत उल्लास अ‍ॅपवर यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. काही शिक्षक संघटनांनी हे शिक्षण बाह्य काम असल्याचे सांगत बहिष्कार टाकला होता. परंतु हे काम न करणाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. निरक्षराचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. तर कमी प्रमाण सिंधुदुर्ग जिल्हयात आहे .

डिस्काउंट देणाऱ्या मेडिकल दुकानांवर कारवाई

पुण्यातील मेडिकल दुकानांवर कारवाई होणार आहे. डिस्काउंटचा बोर्ड लावणाऱ्या औषध दुकानांवर कारवाई करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. सवलतीच्या दरात औषध विकणे मेडिकल विक्रेत्यांना महागात पडणार आहे. आता पुणे शहरातील सर्व मेडिकलची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी होणार आहे.

पुण्यात इस्त्रायलचा केला निषेध

पुणे शहरात पॅलिस्टाईन नागरिकांसाठी दुआचे अयोजन मुस्लीम समाजाकडून करण्यात आले. पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम नागरिकांकडून दुआ मागण्यात आली. पॅलिस्टाईनमधील निष्पाप नागरिकांवर इस्त्रायलकडून होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम धर्मीय नागरिक एकट्वले आले. अनेक नागरिकांनी एकत्र येत इस्रायलचा निषेध केला आहे.

रुग्णाकडून जादा बिल घेतल्याचा आरोप

अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका रुग्णाकडून जादा बिल घेतल्याचा आरोप भारती विद्यापीठ रुग्णालयावर झाला आहे. २४ तासांत या रुग्णालयाने ७० हजार रुपयांचे बील लावले असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी २७ हजार रुपये बील भरले होते. परंतु, पूर्ण रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. यामुळे संघर्ष सेना आणि धर्मरक्षक दलाच्या वतीने रात्री रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने तात्काळ डिस्चार्ज दिले गेले.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.