PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी उरले १५ दिवस, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापैकी आता १५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती दाखल कराव्यात असं आवाहन करण्यात आलं

PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी उरले १५ दिवस, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 4:05 PM

पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट २३ गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापैकी आता १५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती दाखल कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. (Few days left to give objections and suggestions on PMRDA development plan)

कुठे पाहता येईल विकास आराखडा?

हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन काही दिवसांत विकास आराखडा मंजूर केला जाणार आहे. पुणेकरांना पीएमआरडीएच्या औंध इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन इथल्या कलादालनात हा विकास आराखडा उलपब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच पीएमआरडीएच्या www.pmrda.gov.in या वेबसाईटवरही विकास आराखडा पाहता येईल.

काय आहे विकास आराखड्यात?

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्र 6914.26 चौ. किमी आहे. हे राज्यात सर्वात मोठं आणि देशात तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्षेत्र आहे. यामध्ये २ रिंग रोड, हायस्पीड आणि क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १५ नागरी केंद्रे, ४ प्रादेशिक केंद्रे, पर्यटनस्थळं, विद्यापीठे, जैवविविधता उद्याने, अक्षय ऊर्जा निर्मिती केंद्रे, अग्नीशमन केंद्रे, औद्योगिक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार केंद्रे, कृषी प्रक्रिया संशोधन आणि विकास केंद्र, ग्रामीण सबलीकरण केंद्र, सार्वजनिक गृह प्रकल्प, वैद्यकीय संशोधन केंद्र आणि अपघात उपचार केंद्र

कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

पीएमआरडीएच्या औंध कार्यालयात महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना देता येणार आहेत. यासोबतच pmr.dp.planning@gmail.com या ई-मेलवरही हरकती आणि सूचना पाठवता येतील. मुदतीनंतर आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

पीएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राधिकरण हद्दीतल्या २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांची प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 29 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएमारडीएच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 30 जून रोजी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणूनही पीएमारडीएची नियुक्ती करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

पुण्यात महसुली खटल्यांच्या सुनावणीसाठी क्यूटी सिस्टीम, खटल्यांची माहिती मिळणार मोबाईलवर, राज्यातला पहिलाच प्रयोग

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.