AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पुण्यातील हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल, कशामुळे सुरु आहे आजी-आजोबांचा आनंदोत्सव

Pune Viral Video : पुणे तिथे काय उणे ! याचा प्रत्यय पुन्हा आला. ती लोक तब्बल ७० वर्षांनी एकत्र आली. मग दंगा, मस्ती झाली. नाच-गाणेही झाले. सुख-दु:खाच्या गप्पाही रंगल्या. अन् पुन्हा भेटण्याचा निर्णय झाला.

Video : पुण्यातील हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल, कशामुळे सुरु आहे आजी-आजोबांचा आनंदोत्सव
| Updated on: Jun 13, 2023 | 4:22 PM
Share

रणजित जाधव, पुणे : आनंद, उत्साह व्यक्त करण्यासाठी कधी वय आडवे येत नाही. फक्त निमित्त हवे असते. मग तब्बल ७० वर्षांनी एकत्र आल्यावर आनंद किती होणार? याची कल्पना तुम्हाला येणार नाही. पुण्यातील हे आजी- आजोबा आता जवळपास ८५ वर्ष वयाचे. सर्वांमध्ये एक कॉमन दुवा आहे. यामुळे ती मंडळी एकत्र आली अन् धमाल मस्ती केली. पुणे शहरातील या प्रकारामुळे पुणे तेथे काय उणे? असेच म्हणावे लागेल.

काय आहे विषय

सध्या सोशल मीडियामुळे जुने मित्र एकत्र येऊ लागले आहे. त्याचे स्नेह संमेलन होत आहे. परंतु ही मंडळी युवा..अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वी त्यांची शाळा किंवा कॉलेज संपले.  परंतु पुणे शहरात दहावीतील विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी गेट टुगेदर केले. परंतु हे दहावीचे विद्यार्थी १९५४ च्या बॅचचे होते. म्हणजेच तब्बल ७० वर्षांनी ही मंडळी एकत्र आली. कोणी राज्यात होते, कोणी देशाच्या दुसऱ्या शहरात होते. मग सर्वांना आठवले ते शाळेतील दिवस… सर्वांना लहानपण देग देवा…चा अनुभव आला. मग बिधधास्त होत गप्पा रंगल्या. गेम खेळले गेले. गाणी म्हटली गेली… अगदी किशोरवयीन असल्याचा अनुभव या मंडळींनी घेतला. अन् ८५ व्या वर्षी नाचलेसुद्धा…

शाळेतल्या आठवणींमध्ये रंगले

तब्बल ७० वर्षांनी सर्व जण एकत्र भेटले. मग गप्पांचा फडही रंगला. कोणी शाळेत असताना कसे होते, किती खोड्या करायचे, आपले शिक्षक-शिक्षिका कसे होते, शिक्षकांनी आपणास कसे घडवले…अशा गप्पा सुरु झाल्या. मग आजी-आजोबांचे मुले अन् नातवंडे यांची चर्चा झाली. वय विसरुन झालेली दंगा, मस्ती झाली. खाणेपिणे झाले. मग अशा या क्षणाचा एक धमाल व्हिडिओ काढला गेला अन् तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अन् पाहता पाहता तो प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी काँमेंट नोंदवल्या. या ग्रुपचे एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर पाहून मराठीतील दुनियादारी या चित्रपटाची आठवण झाली. अन् त्या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आठवला.. तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी…

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.