जयंत पाटील अनुकंपा निकषावर राजकारणात; पडळकरांची खोचक टीका

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (gopichand padalkar Reacts To Jayant Patil's Comment On Maharashtra Chief Minister's Post)

जयंत पाटील अनुकंपा निकषावर राजकारणात; पडळकरांची खोचक टीका

सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत. लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर राजकारणात आलेले अनुकंपा निकषावर राजकारणात आले आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (gopichand padalkar Reacts To Jayant Patil’s Comment On Maharashtra Chief Minister’s Post)

गोपीचंद पडळकर सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर पडळकर यांना प्रतिक्रिया व्यक्त केली असता त्यांनी पाटील यांना घेरले. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली.

जयंत पाटलांना यूनोत पाठवा

जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचं अस्तित्व भविष्यात नसेल

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राज्यात आहे. पण भविष्यात दिसेल की नाही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं होतं. (gopichand padalkar Reacts To Jayant Patil’s Comment On Maharashtra Chief Minister’s Post)

 

संबंधित बातम्या:

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(gopichand padalkar Reacts To Jayant Patil’s Comment On Maharashtra Chief Minister’s Post)

Published On - 2:32 pm, Sat, 23 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI