काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्यांची फोडाफोडी, सहलींना सुरुवात

ज्या ग्रामपंचायतीत पॅनेलला काठावर बहुमत मिळालंय त्या गावात सदस्यांना फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले आहेत. | Gram Panchayat

काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्यांची फोडाफोडी, सहलींना सुरुवात
Gram panchayat

कोल्हापूर/सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचं वारं आता शांत झालंय. विजयाचा गुलालही उधळला गेलाय.आता ज्या ग्रामपंचायतीत पॅनेलला काठावर बहुमत मिळालंय त्या गावात सदस्यांना फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे आता अपक्षांना किंबहुना फुटीर सदस्यांना सोन्याचा भाव आला आहे. (Gram Panchayat which has a majority on the edge Member breakup begins)

आतापासूनच संभाव्य सरपंचपदाच्या उमेदवारांनी किंबहुना पॅनेलप्रमुखांनी जुळवाजुळव सुरु केली आहे. तर काही ठिकाणी मात्र काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत देखील आरक्षण असलेले उमेदवार निवडून आलेले नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी खरी गंमत पाहायला मिळणार आहे. गावपुढारी अशा वेळी काय करतात, याकडे सगळ्यांच्या नजरा असतात.

कोल्हापुरात काठावरील बहुमत असलेल्या गावात सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. शिरोळच्या उदगाव मध्ये स्वाभिमानीचे सदस्य कलीमुन नदाफ महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाले आहेत.

उदगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला 8 तर स्वाभिमानीला मिळाल्या होत्या 9 जागा. आता नदाफ यांनी महाविकास आघाडीच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच वर्चस्व निर्माण झालं आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वाभिमानीकडून नदाफ यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय.

दुसरीकडे सोलापुरातही सरपंचपदाची लॉटरी जाहीर होताच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फोडाफोडीच्या राजकारण सुरुवात झाली आहे. करमाळा तालुक्यातील देवळाली, हिवरवाडी, मांगी, साडे, देवीचामाळ ग्रामपंचायतीत काठावर बहुमत आहे. त्यामुळे संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी अनेक सदस्य सहलीला गेले आहेत. तर अनेक ठिकाणी अपक्ष सदस्याला चांगलाच भाव चढलाय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडलं तर 18 जानेवारीला निकालाचा गुलाल उधळला गेला. 27 जानेवारीला सोलापूर आणि कोल्हापुरात आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे संभाव्य सरपंचपदाच्या उमेदवारांनी पुढील तयारी सुरु केली आहे.

(Gram Panchayat which has a majority on the edge Member breakup begins)

हे ही वाचा :

नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम

Published On - 9:41 am, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI