AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत? पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ; काय म्हणाले नेमके?

राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन करत असताना, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केले आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, कारण तसे झाल्यास मोदींचा पराभव किंवा निवडणूक गैरप्रकार समोर येतील, असे चव्हाण म्हणाले. आंदोलने दडपण्याचा प्रयत्न सुरू असून, सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षांना भेटायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.

ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत? पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ; काय म्हणाले नेमके?
Prithviraj ChavanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 5:57 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एकीकडे गेल्या आठ दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वत:ला अटक करूनही घेतली आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीनेही दिल्लीत जोरदार आंदोलन केल्याने दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. दिल्लीत काँग्रेस आंदोलन करत असतानाच काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे विधान केलं आहे. सर्व तरुण रस्त्यावर उतरले होते. सरकार घाबरलेले आहे. निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात अराजकता माजवण्यात येत असल्याचा आरोप चुकीचा आहे, असं सांगतनाच ज्ञानेश कुमार राजीनामा देतील असं वाटत नाही. त्यांनी राजीनामा दिला तर मोदींचा पराभव होईल, किंवा निवडणूका कशा झाल्या हे लोकांना समजेल, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

सरन्यायाधीशांनी भेटायला हवं होतं

ज्ञानेश कुमार जेवढे दिवस राजीनामा देणार नाहीत, तेवढं आमच्यासाठी चांगलंच आहे, असं सांगतानाच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना फक्त निवेदन द्यायचं होतं. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटायला हवं होतं, असं मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र आणि राज्यातील सरकार खाली खेचलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारचं दुष्काळाकडे दुर्लक्ष

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. दुष्काळाची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्यांनी उपाययोजना कराव्यात. पण दुष्काळाकडे कुणाचंच लक्ष नाहीये. राज्य सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यावर भर देत आहे, अशी टीका त्यांनी केली.

आपलाच विजय होईल

यावेळी पुण्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर त्यांनी भाष्य केलं. सहा वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरात काम केले आणि विजय खेचून आणला. भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुद्द्यावर मतदार आपल्याला विजयी करतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल, याबाबत मला शंका नाही, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे त्या विधानसभा गाजवतील असं मला वाटतं. आपले उमेदवार सहज निवडून येतील, अशा भ्रमात राहू नका. उमेदवारांचा प्रचार करा. मेहनत घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा