जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफांचा सोमय्यांना इशारा

भाजप नेते किरीट सोमय्यांकडून जावयला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संतापले आहेत. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. (hasan mushrif reply to kirit somaiya over third scam)

जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफांचा सोमय्यांना इशारा
hasan mushrif

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्यांकडून जावयला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संतापले आहेत. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. त्यांचं नाव सातत्याने घेऊ नका. हे काही बरोबर होणार नाही, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. (hasan mushrif reply to kirit somaiya over third scam)

हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. सोमय्यांनी तिसरा घोटाळा जाही केला. खरे तर ते दहा अकरा वर्षापूर्वीचे जुने कारखाने आहेत. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही तरी काढा असं त्यांना सांगत होतो. पण त्यांनी एक जावई शोध लावला आणि आज आणखी एक घोटाळा काढला. त्यात माझ्या जावयाचं नाव घेतलं. मी त्यांना सूचना करेल जावयाचं नाव आणि कुटुंबीयांचं नाव ते सातत्याने घेत आहेत. हे काही बरोबर नाही. ज्याचा कशाचाही संबंध नाही. माझा जावई स्वत:चा व्यवसाय करत आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सोमय्या करत आहेत. हे निषेधार्य आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

100 कोटींचा दावा दाखल

सोमय्यांनी आज तिसरा घोटाळा जाहीर केला. दुसऱ्या घोटाळ्याचा आज त्यांनी काही उल्लेख केला नाही. त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. पण त्यांनी पुन्हा अशी वक्तव्ये करू नये म्हणून त्यांच्यावर बंदी आणण्याची याचिकाही दाखल केली होती. आजच त्याची सुनावणी सुरू होती. पण त्याची नोटीस त्यांनी घ्यायला नकार दिला. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊन त्यावर एकतर्फी निर्णय येण्याची शक्यता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

माझा आवाज दाबू शकणार नाही

मी 25 वर्ष मेहनत करून राजकारणात आलो. पण माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. कोणत्याही प्रकारे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असं सांगतानाच सोमय्यांनी कोल्हापुरात यावं. आरोप करावेत पण अति करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोमय्या ती कागदपत्रे घेऊन फिरत आहेत

सोमय्या यांनी 1500 कोटींचा तिसरा घोटाळा काढला. तो कुठून काढला माहीत नाही. रजिस्टर कंपनीसाठी जी कागदपत्रे लागतात, ती किरीट सोमय्या घेऊन फिरत आहेत, असं सांगतानाच सोमय्या शरद पवार यांनाही टार्गेट करत असून ते काही बरोबर नाही, असंही त्यांनी सांगितलं. (hasan mushrif reply to kirit somaiya over third scam)

 

संबंधित बातम्या:

अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है; नितेश राणेंच्या सूचक विधानाने खळबळ

‘भारत बंद’चे कारस्थान महाराष्ट्रात फसले, भाजपचा दावा; अनिल बोंडेंकडून शेतकऱ्यांचे अभिनंदन!

R R आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली, सोमय्या म्हणाले, आबा यांच्यासारखे नव्हते!

(hasan mushrif reply to kirit somaiya over third scam)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI