मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने पुकारलेल्या भारत बंदचे आवाहन धुडकावून महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेने केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला. असा दावा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला. तसंच त्यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. केंद्राचे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचारास चोख उत्तर देऊन या कायद्यांविरोधातील राजकीय कारस्थान मोडून काढले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, काल देशभरात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात भारत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्षही त्यात सहभागी झाले होते. (Anil Bonde claims that Bharat Bandh agitation failed in Maharashtra)