AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC | पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासनेची निवड

नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी1 ते 14 मार्च या 14 दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत.

PMC | पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासनेची निवड
Hemant Rasane Chairman of the Standing Committee
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 7:38 PM
Share

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation)स्थायी समितीची (Standing Committee) निवडणूक आज सकाळी पार पडली. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे हेमंत रासने (BJP Hemant Rasane) यांची निवड झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा रासने यांची निवड झाली आहे. या अध्यक्ष पदासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. हेमंत रासने यांनी 10 विरूद्ध 6 असा विजय मिळवून राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला आहे.

अधिकवेळा अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक

नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28मार्च रोजी संपली.    तर महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी 1 मार्च ते 14 मार्च या 14  दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत. यी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 16 सदस्य आहेत. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती.

भाजपच्या दृष्टीकोनातून  हेमंत रासने  महत्त्वाचे

महापालिकेचा कार्यकाल  14 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ओबीस आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक लांबलीच तर आपल्या प्रभागात केलेली विकासकामे तशीच पडून राहतील याची भीती सत्ताधाऱ्यांना आहेत. यामुळेच येत्या दहा दिवसात अशा कामांची उद्‌घाटने उरकण्यावर सत्ताधारी भाजप तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या नगरसेवकांची धांदल उडणार आहे. या सगळ्यासाठी भाजपच्या दृष्टीकोनातून स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासने येणे महत्त्वाचे आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणावर राज्यपालांशी चर्चा झाली नाही : छगन भुजबळ

Indians In Ukraine : गोळी लागलेल्या जखमी भारतीय तरुणाचा व्हिडिओ, मदतीची याचना ऐका मायबाप सरकार

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.