पुण्यातील सात तालुक्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका; स्थानिक अधिकाऱ्यांना हेडक्वार्टरमध्येच राहण्याचे आदेश

Landslide in Pune | जेसीबी, महावितरण, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, जलसंपदा विभागातील कर्मचारी यांना हेडक्वार्टर न सोडण्याच्या सूचना आहेत. रस्त्यावर दरड पडल्यास लगेचच हटवण्यात यावी. जेणेकरून मदत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना बजावले आहे.

पुण्यातील सात तालुक्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका; स्थानिक अधिकाऱ्यांना हेडक्वार्टरमध्येच राहण्याचे आदेश
दरड कोसळण्याचा धोका
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:01 AM

पुणे: पुण्याच्या पश्चिम घाटातील सात तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट देण्यात आला आहे. या तालुक्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या (Landslide) दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

जेसीबी, महावितरण, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, जलसंपदा विभागातील कर्मचारी यांना हेडक्वार्टर न सोडण्याच्या सूचना आहेत. रस्त्यावर दरड पडल्यास लगेचच हटवण्यात यावी. जेणेकरून मदत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना बजावले आहे.

पुण्यात फ्लड रिलीफ वॉर रुमची स्थापना

लष्करी मदतकार्यासाठी पुण्यात दक्षिण मुख्यालयात फ्लड रिलीफ वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात पुरवल्या जाणाऱ्या लष्करी मदतीवर पुण्यातून नियंत्रण ठेवले जाईल. शुक्रवारी पुण्यातून लष्कराच्या 15 तुकड्या रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीत तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच अतिरिक्त 10 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यातील पावसाचा जोर ओसरणार

राज्यातील काही भागात 28 तारखेपर्यंत पाऊस घेणार विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला मिळणार दिलासा मिळणार आहे. मात्र, कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल.मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert: राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, 28 जुलैपर्यंत उसंत?

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ

“इतर राज्यांसाठी मदत, महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही, बॉलिवूडकरांनो संवेदनशील व्हा, मदतकार्याला हातभार लावा”

(High alert in Pune due to Heavy Rain)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.