AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय, दुसऱ्या डोसला प्राधान्य : अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar Pune) यांनी आज वाढत्या कोरोना संदर्भात पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय, दुसऱ्या डोसला प्राधान्य : अजित पवार
Ajit Pawar
| Updated on: May 07, 2021 | 3:13 PM
Share

पुणे : लहान मुलांमध्ये कोरोनाचा (coronavirus in kids) धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले (DCM Ajit Pawar). ते पुण्यात बोलत होते. (Hospital reserved for kids in Pune Maharashtra due to Covid-19 affecting children Said Ajit Pawar)

भारतात तयार झालेल्या कोरोना लसी (Corona vaccine India) बाहेरच्या देशांना अगोदर द्यायला नको होत्या. रशियाने त्यांचं झाल्यावर लस दिली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधला. इतकंच नाही तर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनवाला (Adar Poonawalla) यांना फोन लावला होता, ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी आज वाढत्या कोरोना संदर्भात पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

लस बाहेर द्यायची गरज काय होती?

अजित पवार म्हणाले, “लस बाहेर द्यायला नको होती. रशियाने त्यांचं झाल्यावर लस बाहेर दिली. आपल्याकडे अत्यंत चुकीचा निर्णय झाला. बाहेर द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती. नियोजन करायला हवं होतं. लसीचा पुरवठा नसल्यानं राज्याती तुटवडा आहे. आता पन्नास टक्के लस बाहेर देता येईल. देशामध्ये विविध राज्यांना पन्नास टक्के लस द्यायला पाहिजे. सीरमने लस उत्पादन कित्येक पटीने वाढविले. पुढच्या टप्प्यात लशीचा जास्त फायदा होईल”

अदर पुनावालांना फोन

18 ते 44 वयोगटातील लोकांना सरकार लस देणार होते. मात्र पुरवठा नसल्यानं लसीकरण करण्यास अडचण येतेय. अदर पुनवाला यांना फोन लावला होता. ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. तिथे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, असं अजित पवारांनी सांगितलं.

दुसऱ्या डोसला प्राधान्य

पहिला डोस दिला त्यांना दुसरा डोस द्यायला पाहिजे. 40 दिवस उलटून गेले, मात्र लस न दिल्याने संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी बोलणार आहे. दुसरा डोस प्राधान्याने द्यायचा विचार आहे. परदेशातील लस खरेदी करायला केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.

लसीच्या दरांमध्ये तफावत नको. कोर्टाने त्याबाबत सांगितलं आहे. तशी बैठक घेण्याचा विचार करतोय, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. लहान मुलांना पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय (Rajiv Gandhi hospital) राखीव करतोय. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.

पुण्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री बोलतील

पुण्यातील लॉकडाऊनबाबत मी तसा सूतोवाच केला आहे. अनेक नेत्यांचंदेखील मत आहे. पोलिसांशी आम्ही बोललो त्यांच्या अडचणी आहेत. सध्या हायकोर्टाने सूचना केल्या आहेत. पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण नसताना फिरणाऱ्या लोकाची संख्या कमी झाली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

(Hospital reserved for kids in Pune Maharashtra due to Covid-19 affecting children Said Ajit Pawar)

संबंधित बातम्या 

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....