माझा फोटो दिसला तर लोक लस घ्यायला येणार नाहीत: अजित पवार

मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. | Ajit Pawar Covid vaccination

माझा फोटो दिसला तर लोक लस घ्यायला येणार नाहीत: अजित पवार
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 1:25 PM

पुणे: लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर फोटो टाकतात. पण माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेदेखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकला तर लोक अजिबात लसीकरणासाठी फिरकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar on Coronavirus situation in Pune)

ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी पुणेकरांना निर्वाणीचा इशारा दिला. पुण्यात 2 एप्रिलपर्यंत रुग्ण सापडण्याचे प्रमाण इतकेच राहिले तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली.

सध्या लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लागू

पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार

यानुसार पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे. तसेच पिंपरीचे जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिलपासून सुरु करणार आहोत. पुण्यातील ससून रुग्णालयातील 500 बेड्सची व्यवस्था करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल

येत्या शुक्रवारी लॉकडाऊन संदर्भात नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या आठवड्यापासून पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले. संबंधित बातम्या :

खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

(DCM Ajit Pawar on Coronavirus situation in Pune)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.
कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, फडणवीस असं का म्हणाले?
कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, फडणवीस असं का म्हणाले?.