Pune rain : पुण्यासह राज्यभरात या आठवड्यात कसा असेल पाऊस? हवामान विभागानं काय म्हटलं? वाचा…

महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल. मात्र तो जोमदार असणार नाही. पुणे शहरासाठीही, पुढील काही दिवसांत हलक्या पावसाचे संकेत देण्यात आले असून अंशतः ढगाळ ते सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण कायम राहील.

Pune rain : पुण्यासह राज्यभरात या आठवड्यात कसा असेल पाऊस? हवामान विभागानं काय म्हटलं? वाचा...
पुणे पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 7:30 AM

पुणे : 23-24 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत आणि 23-25 ​​जुलै रोजी विदर्भाच्या काही भागांत थोडा मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये किमान 4 ऑगस्टपर्यंत मान्सूनची स्थिती विस्कळीत स्वरुपाची असेल, असेही भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार (Heavy rain) ते अति मुसळधार पावसाच्या विपरीत, कोकणासह राज्याच्या विविध भागात पुढील एका आठवड्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आयएमडी येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात 22 ते 28 जुलै या कालावधीत सामान्य किंवा किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात यलो अलर्ट

23-24 जुलै दरम्यान, कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि 23-25 ​​जुलै दरम्यान, विदर्भातील काही भागांना यलो अलर्ट असणार आहे. तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा यासह इतर भागात मध्यम स्वरूपाची शक्यता आहे, असेही कश्यपी म्हणाले. जुलैच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस न झालेल्या देशातील सर्व प्रदेशांमध्ये आता काही प्रमाणात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये वायव्य भारतातील प्रदेशांचाही समावेश आहे. सरासरी समुद्रसपाटीवरील मान्सून उत्तरेकडे सरकला आहे आणि आता त्याच्या सामान्य स्थितीजवळ आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय

महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल. मात्र तो जोमदार असणार नाही. पुणे शहरासाठीही, पुढील काही दिवसांत हलक्या पावसाचे संकेत देण्यात आले असून अंशतः ढगाळ ते सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण कायम राहील. 23 ते 25 जुलैपर्यंत शहरात ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता असली तरी मध्यम पावसाची शक्यता कमी असेल, असे ते म्हणाले. कश्यपी म्हणाले, की 23-25 ​​जुलै रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आगामी एकाकी मुसळधार पाऊस पडेल. या काळात पश्चिमेकडील वारे पुन्हा जोरात येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.