पिंपरी चिंचवडमध्ये आज 168 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर केवळ एक मृत्यू

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) क्षेत्रात मागच्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोबतच मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचं चित्र आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज 168 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर केवळ एक मृत्यू
कोरोना

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) क्षेत्रात मागच्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोबतच मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 168 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे तर केवळ एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (In Pimpri-Chinchwad, 168 new corona cases were reported today, but only one death)

4816 कोरोना चाचण्या, आतापर्यंत 4386 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत पिंपरी चिंचवडमध्ये 4816 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबत आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ही 17,03,446 वर गेली आहे. आजवरची कोरोनाबाधितांची संख्या ही 1,68,098 वर पोहोचली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत 4386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

1322 कोरोनाचे सक्रिय रुग्ण

सध्या पिंपरी चिंचवडमध्ये 1322 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 643 हे शहरातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तर 679 कोरोनाबाधित हे गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.

आज पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 4 हजार 78 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. यामध्ये 45 वर्षावरचे 2207 नागरिक होते तर 18 ते 45 वयोगटातल्या 1784 नागरिकांना कोरोनाची लस दिली गेली. यासोबतच 87 फ्रंटलाईन वर्कर्सचंही लसीकरण करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य, 70 टक्के लशी राखीव, आज 195 ठिकाणी होणार लसीकरण

VIDEO : अजित पवारांनी स्वत: कचरा उचलला, कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी काय घडलं?

पुणेकरांसाठी लोकल प्रवास सुरू, युनिव्हर्सल पाससाठी कसा कराल अर्ज?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI