AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांसाठी लोकल प्रवास सुरू, युनिव्हर्सल पाससाठी कसा कराल अर्ज?

महापालिकेने पुणे स्टेशन (Pune Station) आणि शिवाजीनगर स्टेशन (Shivajinagar Station) या ठिकाणी पात्र प्रवाशांना पास देण्यासाठी कक्ष कार्यन्वित केला आहे.

पुणेकरांसाठी लोकल प्रवास सुरू, युनिव्हर्सल पाससाठी कसा कराल अर्ज?
पुणे लोकल
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 12:32 PM
Share

पुणे : राज्याच्या आरोग्य विभागाने 11 ऑगस्टला कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून (Local Trains) प्रवास करण्याची परवानगी देणारा आदेश काढला. त्याची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून सुरू होणं अपेक्षित होतं. पुणे महापालिकेनेही (Pune Municipal Corporation) या आदेशाला अनुसरून नवी नियमावली जारी केली. पण पुणेकरांना लोकल पाससाठी (Local Train Pass) प्रतीक्षा करावी लागत होती. ती आता संपली आहे. महापालिकेने पुणे स्टेशन (Pune Station) आणि शिवाजीनगर स्टेशन (Shivajinagar Station) या ठिकाणी पात्र प्रवाशांना पास देण्यासाठी कक्ष कार्यन्वित केला आहे. (Universal Pass will be required for travel in local trains in Pune)

सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार कक्ष

राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर पुणेकरांना लोकलमधून प्रवासाची संधी मिळाली. लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं आदेश दिल्यानंतर महापालिकेने बुधवारी पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्टेशन परिसरात प्रवाशांना पास देण्यासाठी मदतकक्ष सुरु केला आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे.

पास मिळवण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी लोकलप्रवासाला परवानगी मिळाली असली तरी अनेकांना त्यासाठी मदतकक्ष उभारण्यात आला आहे याची माहितीच नाही. त्यामुळे पास मिळवण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. लोकल सेवेतून प्रवासासाठी प्रवाशांना ओळखपत्र किंवा युनिव्हर्सल पास देण्यात येत आहे. याद्वारे प्रवाशांना एक महिन्याचा मासिक पास दिला जात आहे. नागरिकांना मदतकक्षाविषयी माहिती व्हावी यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

‘युनिव्हर्सल पास’साठी कसा करणार अर्ज?

https://epassmsdma.mahait.org या वेबसाईटवर जा. – कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनी ‘पास’ हा पर्याय निवडा. – कोविन अॅपला जोडलेला मोबाईल नंबर नमूद करा. – त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल, हा ओटीपी नमूद करा. – ओटीपी दिल्यानंतर अर्जदाराच्या नावासमोर ‘जनरेट पास’ हा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. – फोटोसाठी विंडो ओपन होईल. त्यात तुमचा फोटो अपलोड करून ‘अप्लाय’ बटणवर क्लिक करा. – अप्लाय केल्यानंतर 24 तासांत तुमचा ‘युनिव्हर्सल पास’ मिळेल.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य, 70 टक्के लशी राखीव, आज 195 ठिकाणी होणार लसीकरण

VIDEO : अजित पवारांनी स्वत: कचरा उचलला, कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी काय घडलं?

पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.