AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bullock cart race | मुकी बिचारी कशीही हाका, पुण्यातल्या बैलगाडा शर्यतीत बैल जेव्हा चारीमुंड्याचीत होऊन पडतात, Video Social media वर व्हायरल

बैलगाडा शर्यतीत कोणतही राजकारण नको, असे आवाहन माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलं आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यावर राज्यातील पहिली अधिकृत बैलगाडा शर्यत होतीय. याचा खूप आनंद आहे. गाडामालक आणि बैलगाडा प्रेमींमध्येही उत्साह आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष परवानगी घेऊन दोन दिवस ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

Bullock cart race | मुकी बिचारी कशीही हाका, पुण्यातल्या बैलगाडा शर्यतीत बैल जेव्हा चारीमुंड्याचीत होऊन पडतात, Video Social media वर व्हायरल
bulk cart race
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 10:36 AM
Share

पुणे – आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी (Landewadi)च्या घाटात अखेर भिर्रर्रचा… नाद घुमला ,भंडारा उधळत पहिली बारी झाली, नियमांचे पालन करत शर्यतीची धुराळा उडाला खरा.. पण याच शर्यतीत बैलांची मोठी हेळसांड झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर(Social media)  व्हायरल झाले आहेत. शर्यतीच्या बारीत धावलेले बैलजोड्या (Bullock cart race ) शर्यतप्रेमींच्या अतिउत्साह, किंकाळ्यांमुळे बैलजोड्या बिथरून सैरावैर धावत सुटल्या. जिथे रस्ता दिसेल तिथं बैलजोड्या धावल्या यामध्ये काही बैलजोड्या खाली कोसळल्याचेही दिसून आले. शर्यतीत वेगवान धावल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आजपासून दोन दिवस ही शर्यत सुरु राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लांडेवाडीत पहिल्यांदाच अधिकृत बैलगाडा शर्यत भरली होती.

बैलजोड्या बिथरून सैरावैर धावत सुटल्या

बैलगाडा शर्यतीत  राजकारण नको आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी बैलगाडा शर्यतीच्या मुद्दावरुन पुणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात मोठं राजकारण रंगल होत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण सांगत ऐनवेळी शर्यत रद्द करण्यात आली. शर्यत रद्द झाल्याने शिवसेना नेते आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांच्यामध्ये राजकीय वाद चांगलाच रंगला होता. मात्र आज झालेल्या शर्यतीनंतर बैलगाडा शर्यतीत कोणतही राजकारण नको, असे आवाहन माजी खासदार आढळराव पाटील यांनी केलं आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यावर राज्यातील पहिली अधिकृत बैलगाडा शर्यत होतीय. याचा खूप आनंद आहे. गाडामालक आणि बैलगाडा प्रेमींमध्येही उत्साह आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष परवानगी घेऊन दोन दिवस ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सर्व नियमांचे पालन केलं जात आहे. असे मत आढळराव पाटील यांनी केलं आहे.

इथे होणार आहेत शर्यती लांडेवाडीत बहुप्रतीक्षित बैलगाडा शर्यत आज (दि. 10फेब्रुवारी) सकाळी 7:30 वाजता शर्यतीला सुरुवात होणार आहे. तर मावळ तालुक्यातील नाणोलीमध्ये बैलगाडा शर्यत शनिवार (दि. 11 फेब्रुवारी) ला सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. या बैलगाडा शर्यतींमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 354 बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत .

शर्यतीला भरघोस रक्कम प्रथम क्रमांक- प्रथम क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक बारीस एक मोटारसायकल द्वितीय क्रमांक-1 लाख 51 हजार रुपये रोख आणि एक अर्धा तोळ्यांची अंगठी तृतीय क्रमांक-1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी चतुर्थ क्रमांक-75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी घाटाचा राजा -1 एक तोळ्याची अंगठी

-शर्यत आकर्षक फायनल सम्राट प्रथम क्रमांक-51 हजार रुपये रोख द्वितीय क्रमांक-31 हजार रुपये रोख तृतीय क्रमांक-21 हजार रुपये रोख

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

औरंगाबाद | चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाण पुलाच्या DPR ला मंजुरी, मंत्री नितीन गडकरींशी आणखी कोणत्या प्रकल्पांवर चर्चा?

धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, नाशकातले पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.