नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम

इंदापुर तालुक्यातील अंथुर्णे गावातील नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम पहावयास मिळत आहे. | Ganesh Shinde Anthurne

नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम
ganesh Shinde Anthurne Grampanchayat Member (1)
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:19 PM

इंदापूर : तालुक्यातील अंथुर्णे गावातील नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नवनिर्वाचित सदस्य गणेश शिंदे यांनी वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयास रंगरंगोटी व स्वच्छता मोहीम उपक्रम सुरु केला आहे. त्यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचं गावात कौतुक होत आहे. (Indapur Anthurne Gram panchayat member Ganesh Shinde Creative Campaign)

अंथुर्णेत ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र.4 मधून शिंदे हे युवा कार्यकर्ता गावातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहे. तब्बल 657 मते मिळवून 559 मतांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिंदे हे मास्टर इन कम्युटर सायन्स आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होण्यापूर्वी योजलेल्या कामांची पूर्तता केल्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात पाऊल न ठेवण्याचा संकल्प केलेल्या ध्येयवेड्या युवा सदस्याने निवडून येताच चक्क वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयास रंगरंगोटी करण्यास सुरवात केली आहे. तर स्मशानभूमी परिसर व गावातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करत नव्या उमेदीने काम करणार असल्याची जणू रंगीत तालीम सुरु केल्याने गावभर या युवा कार्यकर्त्याचे कौतुक सुरु आहे.

अंथुर्णेत गावची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालय परिसराची स्वच्छता करून घेतली आहे. कार्यालयाच्या समोरच्या मैदानात लाल माती टाकून गावातील रस्ते साफसफाई करून घेतले आहे. प्रामुख्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले असून गावातील स्मशानभूमी परिसरातील रस्ता स्वच्छ करून घेतला आहे. या कामासाठी जवळपास 50 हजार रुपयांहून अधिक पैसे वैयक्तिक खर्च केले आहेत.

त्यांच्या या कामात ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच राहुल साबळे,नाना पाटील,अंकुश साबळे,अंकुश गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहान देत आहेत.

अंथुर्णे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता

अंथूर्णे गाव हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गाव म्हणून म्हणून परिचित आहे. या गावची निवडणुक भरणेंसाठी प्रतिष्ठेची मानली गेली. भरणेंनीही जातीने लक्ष घालत आपल्या गावातील निवणडूक बहुमताने जिंकली.

अंथूर्णेत ग्रामपंचायत निवडणूकीत भरणे यांच्या राष्ट्रवादी गटाने 15 पैकी 10 जागा जिंकून आपली सत्ता निर्विवाद टिकवली. या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र सरतेशेवटी राष्ट्रवादीने या ग्रामपंचायतीत वर्चस्व राखलं.

(Indapur Anthurne Gram panchayat member Ganesh Shinde Creative Campaign)

हे ही वाचा :

पुण्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, पूनम कडवळेची 21 वर्षी ग्रामपंचायतीत एन्ट्री

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.