Yerwada jail : कारागृह कसं असतं पाहायचंय? राज्याच्या तुरूंग विभागातर्फे जेल पर्यटन उपक्रम, काय प्रक्रिया असते? जाणून घ्या…

प्रदीप गरड

Updated on: Aug 19, 2022 | 7:30 AM

2021पासून सुमारे 500 पर्यटकांनी भेट दिली. कोविडमुळे ही संख्या कमी आहे आणि आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना प्रवेश देणे बंद केले होते. आता पुन्हा सेवा सुरू झाली आहे, असे सुनील रामानंद यांनी सांगितले.

Yerwada jail : कारागृह कसं असतं पाहायचंय? राज्याच्या तुरूंग विभागातर्फे जेल पर्यटन उपक्रम, काय प्रक्रिया असते? जाणून घ्या...
येरवडा मध्यवर्ती कारागृह
Image Credit source: tv9

पुणे : 26 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्राच्या तुरुंग विभागाने (Prison department of Maharashtra) पुण्यातील 150 वर्ष जुन्या येरवडा मध्यवर्ती कारागृहापासून तुरुंग पर्यटन उपक्रम सुरू केला. 2021पासून किमान 500 पर्यटकांनी येरवडा कारागृहाला भेट दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. 1866मध्ये बांधण्यात आलेले येरवडा मध्यवर्ती कारागृह (Yerawada Central Prison) हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कारागृह आहे आणि त्यात महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या नावावर असलेले सेल आहेत जे अभ्यागतांच्या दौऱ्याचा एक भाग आहे. त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमाचा पहिला टप्पा येथून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पर्यटकांना (Tourist) रत्नागिरी, ठाणे आणि नागपूर कारागृहात फिरण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही ठरवून देण्यात आली आहे. या माध्यमातून तुरूंग पाहता येणार आहे.

कोविडनंतर आता पर्यटक वाढण्याची आशा

जॉइंट सीपी सुनील रामानंद म्हणाले, की 2021पासून सुमारे 500 पर्यटकांनी भेट दिली. कोविडमुळे ही संख्या कमी आहे आणि आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना प्रवेश देणे बंद केले होते. आता पुन्हा सेवा सुरू झाली आहे आणि आम्ही दररोज 15 पर्यटकांच्या तुकडीला प्रवेश देत आहोत. आम्हाला महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून तुरुंग पर्यटनासाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यामुळे आशा आहे, की लवकरच पर्यटकांची संख्या वाढेल. लवकरच ठाणे कारागृहातदेखील हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

ऐतिहासिक ठिकाण

महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाला नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांना येरवडा तुरुंगात कैद ठेवण्यात आले होते. निवडणूक जागांच्या आरक्षणावर ऐतिहासिक ‘पुणे करार’ 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. ते ठिकाण तसेच हँगिंग बॅरॅकदेखील या माध्यमातून पाहायला मिळू शकते. पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या बराकीत फाशी देण्यात आली होती. 2012मध्ये मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील या बॅरेकमध्ये फाशी देण्यात आलेला अजमल कसाब हा शेवटचा कैदी होता, असे रामानंद पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

येरवडा कारागृहात कसे जायचे?

  1. येरवडा कारागृहात फिरू इच्छिणाऱ्यांनी अधीक्षकांशी 020-26682663 या क्रमांकावर संपर्क साधून अर्ज सादर करावा.
  2. अर्जाची छाननी केल्यानंतर परवानगी दिली जाणार
  3. शालेय विद्यार्थ्यांसाठी ₹ 5, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ₹ 10 आणि वैयक्तिक पर्यटकांसाठी ₹ 50 नाममात्र शुल्क आकारले जाते.
  4. पर्यटकांनी ओळखपत्र, आधार कार्ड बाळगणे आवश्यक आहे
  5. पर्यटकांना कारागृहात मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याच्या वस्तू, सामान नेण्यास मनाई आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI