AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी; जयंत पाटलांचा दावा

आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर धाड टाकली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (jayant patil reaction on Income Tax department raid at five private sugar mill in Maharashtra)

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी; जयंत पाटलांचा दावा
jayant patil
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 12:04 PM
Share

पुणे: आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर धाड टाकली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. लखीमपूर येथील हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करणं हाच या धाडीमागचा हेतू आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. लखीमपूरला जी घटना घडली, त्यावर आम्ही तिन्ही पक्षांनी खेद व्यक्त केला. सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. जालियनवालाबाग हत्याकांडासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळेच दुसरीकडे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. लखमीपूरच्या घटनेला भाजप जबाबदार आहे. जालियनवाला बागे सारख हे हत्याकांड केलं आहे. असं धाडसत्रं करून लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचं काम भाजप करत आहे, असं पाटील म्हणाले.

भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला?

भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांचे नाव घेतात, त्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीयाची धाड होते. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. यात काही शंका नाही. भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, असं त्यांनी सांगितलं.

विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न

आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आमचे सर्व नेते सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांनी केलेला नसताना केवळ धाडसत्रं करून त्यांना बदनाम केलं जात आहे. आमच्या लोकांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. काल परवा एनसीबीच्या रेडमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे या देशाच्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही. त्यामुळे समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामोहरण करणं हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यापेक्षा वेगळं काही आहे असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

हा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न

आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी विचारल्यावर सर्व कारखाने त्यांना माहिती देऊ शकले असते. पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची. एकाच वेळी धाड टाकायची, पहाटे धाड टाकायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.

अजितदादांचा संबंध नाही

अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकत्र निवडणूक लढणार

जिल्हा परिषद निवडणूक निकालावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सगळीकडे आम्ही आघाडी करू शकलो नाही तरीही यश आलं. जर आघाडी झाली तर भाजपपेक्षा आमची ताकद मोठी आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन चार टक्के होणार नाही. पण आम्ही आगामी निवडणुकीत आघाडी करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Income Tax : जरडेंश्वर, दौंड शुगर्ससह 5 कारखान्यांवर आयटीचे छापे, अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?

तोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा

उद्यापासून ‘घट’ बसतील पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; शालिनी ठाकरेंचा खोचक सवाल

(jayant patil reaction on Income Tax department raid at five private sugar mill in Maharashtra)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.