Job Alert | पुण्यात रोजगाराच्या सुवर्णसंधी, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा रोजगार मेळावा, असा करा अर्ज

कोरोना काळात बेरोजगार झालेल्यांसाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (Pune District Legal Services Authority) पुढाकार घेतला आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Job Alert | पुण्यात रोजगाराच्या सुवर्णसंधी, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा रोजगार मेळावा, असा करा अर्ज
Job

पुणे : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट आलं होतं. कोरोना काळात बेरोजगार झालेल्यांसाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (Pune District Legal Services Authority) पुढाकार घेतला आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. (Pune District Legal Services Authority has organized an employment fair in Pune)

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (Pune District Legal Services Authority), सिम्बायोसिस लॉ स्कूल (Symbiosis Law School, Pune), डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट (Divine Jain Group Trust) आणि ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशन (Lalita Motilal Sankala Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा होणार आहे.

कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी?

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून औद्योगिक, बांधकाम, हाऊसकिपींग आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. कामगारांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर कामगारांचे अर्ज संबंधित कंपन्यांना पाठविण्यात येणार आहेत. अर्जदाराला कोणत्या कामात रस आणि माहिती आहे, त्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.

कुठे कराल अर्ज?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, नवीन इमारत, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर या पत्यावर जाऊन तुम्हाला थेट अर्ज करता येईल. यासोबतच pratapswa@gmail.com या ई-मेल आयडीवरही आपला अर्ज ऑलाईन पाठवता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे.

टपाल विमा एजंट पदासाठी थेट मुलाखती

टपाल विभागाकडून पुणे शहर आणि जिल्ह्यात टपाल विमा एजंट म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 7 सप्टेंबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. टपाल जीवन विमा एजंट पदाच्या थेट मुलाखतीसाठी जंगली महाराज रस्ता इथं असलेल्या डाकघर अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग या कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्डसह अन्य संबंधित कागदपत्र घेऊन उपस्थित रहायचं आहे.

टपाल विभागातल्या विमा एजंटसाठी 18 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत कुणीही मुलाखत देऊ शकतं. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही जीवन विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल विमा एजंटसाठी पात्र आहेत.

संबंधित बातम्या : 

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI