AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ‘…तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही’, जुन्नर प्राथमिक शिक्षक संघानं काय म्हटलं? वाचा…

जुन्नर (Junnar) तालुक्यातील पंचायत समितीत सन 2012पासून गटशिक्षण अधिकाऱ्याचे (Group Education Officer) पदच रिक्त असल्याने जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक (Educational) कारभाराचा बट्ट्याबोळ उडाला आहे.

Pune : '...तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही', जुन्नर प्राथमिक शिक्षक संघानं काय म्हटलं? वाचा...
जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आणि जिल्हा प्राथ. शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 3:56 PM
Share

जयवंत शिरतर, पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील पंचायत समितीत सन 2012पासून गटशिक्षण अधिकारी (Group Education Officer) हे पदच रिक्त असल्याने जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक (Educational) कारभाराचा बट्ट्याबोळ उडाला आहे. कायम स्वरूपी गटशिक्षण अधिकारी नसल्याने पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या कामात विस्कळीतपणा येऊन शैक्षणिक कामे प्रलंबित आहेत. याबाबत आळे येथे झालेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यक्रमात संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच यावेळेस या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यासमोर याबाबतचा पाढाच वाचला होता आणि त्यांना याबाबत विचारणा केली होती. जुन्नर तालुक्यातच नाही तर राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. ती भरली जावीत, अशी मागणी होत आहे.

‘समस्या लवकरात लवकर सोडवा’

यादरम्यान प्राथमिक शिक्षक सेवक संघटनेच्या वतीने जुन्नर तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी द्या आणि हा तब्बल 11 वर्षाचा वनवास संपवा, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे व जि. प. सदस्य आशा बुचके यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.

शासनाकडे वारंवार मागणी

अनेक कामे खोळंबली आहेत. शिक्षकांना त्यांचे काम नीट करता येत नाही. त्यांची कामे मागे पडतात. शिक्षकांना पदोन्नती देऊन ही पदे भरली जाऊ शकतात. वारंवार शासनाकडे मागणी केली आहे. मात्र ती होत नसेल तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे म्हणाले.

आणखी वाचा :

Pune : बिबवेवाडीतल्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या, MCOCA कायद्यानुसार गुन्हा दाखल

Pune Moot Court : तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यात भरली ‘मूट कोर्ट’ राज्यस्तरीय स्पर्धा, 25 संघ सहभागी

Pune accident : पिकअप ट्रकने रिक्षाला मागून दिली धडक, उरुळी कांचनमधले 11 विद्यार्थी जखमी

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.