कसबा, पिंपरी चिंचवड मतदार संघासाठी आज महत्वाचा दिवस, मनसेचीही एन्ट्री

विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील सर्व घडामोडींवर २ फेब्रवारी महत्वाचा दिवस ठरणार आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक गुरुवारी होणार असून मनसेची नावे राज ठाकरे यांच्यांकडे गेली आहे.

कसबा, पिंपरी चिंचवड मतदार संघासाठी आज महत्वाचा दिवस, मनसेचीही एन्ट्री
निवडणुका जाहीर
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 11:04 AM

पुणे : कसबा विधानसभा व पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या (kasba and pimpri chinchwad by election) पोटनिवडणुकीची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली. परंतु अजूनही कोणत्याही पक्षाने (All party ) आपला उमेदवार जाहीर केला नाही.  पुणे जिल्ह्यातील या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या ()BJP) प्रयत्नांना यश येणार नसल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची एन्ट्री झाली आहे. मनसेने चार जणांच्या नावांची यादी केली आहे. एकंदरीत या सर्व घडामोडींवर २ फेब्रवारी महत्वाचा दिवस ठरणार आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक गुरुवारी होणार असून मनसेची नावे राज ठाकरे यांच्यांकडे गेली आहे.

मनसेची नावांची यादी

मनसेने कसबा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गणेश सातपुते, अजय शिंदे, नीलेश हंडे आणि गणेश भोकरे या चौघांची नावे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. या नावांवर राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे निरीक्षक मुंबईत

जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेले काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे गुरुवारी मुंबईत येत आहे. यापुर्वी त्यांनी १६ इच्छुकांची व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखती घेतल्या होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडल्यामुळे त्यांनी या मुलाखती व्हिडिओ कॉलवर घेतल्या होत्या. आता गुरुवारी ते मुंबईत आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीसंदर्भात निर्णय घेणार आहे.

राष्ट्रवादीची तयारी

कसबा पेठची जागा काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली नव्हती. परंतु पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित करत आपणच निवडणूक लढवली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार ९ उमेदवारांची यादी तयार केली आहे. आता यासंदर्भात २ फेब्रवारी रोजी अजित पवार बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

भाजपची सबुरी

पिंपरी चिंचवड आणि पुणे दोन्ही मतदार संघ भाजपचे होते. भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या. आता त्या ठिकाणी भाजप कोणाला उमेदवारी देणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. भाजपने नावांची यादी केंद्रीय नेत्यांकडे पाठवली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.