AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज दूध संघाच्या (Katraj) अध्यक्षपदी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) सहकार पॅनेलने 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत.

कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध
कात्रज दूधसंघाच्या अध्यक्ष केशरबाई पवार तर उपाध्यक्ष राहुल दिवेकर
| Updated on: Apr 04, 2022 | 3:38 PM
Share

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज दूध संघाच्या (Katraj) अध्यक्षपदी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीच्या (NCP) सहकार पॅनेलने 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी (दि. 3) सर्किट हाऊस येथे इच्छुक संचालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान केशरबाई पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली असून राष्ट्रवादीने जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद प्रथमच महिलेला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेली नावे सोमवारी संचालकांसमोर सांगितली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध घोषित केली नावे

सोमवारी (दि. 4) संघाच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे कामकाज सुरू केले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी केशरबाई पवार आणि उपाध्यक्षपदासाठी राहुल दिवेकर यांचेच अर्ज आले. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध घोषित केली.

कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतषबाजी

कात्रज दूध संघाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून केशरबाई पवार यांनी काम पाहिले आहे. कात्रज दूध संघावर त्या चौथ्यादा विजयी झाल्या आहेत. तर राहुल दिवेकर हे प्रथमच विजयी झाले असून, पहिल्याच निवडणुकीत उपाध्यक्षपद मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. दरम्यान, या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.

आणखी वाचा :

Dilip Walse Patil : ‘धार्मिक वाद निर्माण करून रस्त्यावर उतरायचं आणि पुन्हा कायदा-सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करायचे’

Pune IPL betting : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एकाचा शोध सुरू

Pune water problem : पाण्याच्या समस्येनं आंबेगाव पठारचे नागरिक हैराण, क्षेत्रीय कार्यालयावर रासपनं काढला हंडा मोर्चा

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.