पुणे शहरात बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे थरार, पाठलाग करत कोयत्याने हल्ला

Pune Crime News | पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता निर्माण होणारी परिस्थिती आहे. पुणे शहरात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर काही तासांत कोयत्याने हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. काही तासांच्या अंतराने पुण्यात गुन्हेगाराची दोन मोठ्या घटना घडल्या.

पुणे शहरात बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे थरार, पाठलाग करत कोयत्याने हल्ला
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 10:31 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | पुणे शहरात कोयता गँगचा (koyta gang) अधुनमधून धुडघुस सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात (Crime News) धडक कारवाया केल्यानंतर गुन्हेगारांचे हल्ले सुरुच असतात. रविवारी रात्री पुणे शहरात गोळीबार झाला. किरकोळ वादातून एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखत गोळी झाडली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेच्या काही तासांत पुणे शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली. सिनेस्टाईल पाठलाग करत कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे गुन्हेगारीची घटना पुणे शहरात घडली. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी काही जण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किरकोळ वादामधून तरुणाचा खून

पुणे शहरातील बाणेरमध्ये किरकोळ वादातून गोळीबार करत एकाला जखमी केले होते. रविवारी मध्यरात्री आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्यात वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर सरळ गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर दुसरी घटना पुण्यातील गणेश पेठेत घडली. या भागांतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर रविवारी मध्यरात्री बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे थरार घडला. किरकोळ वादातून नंदकुमार हादगे या तरुणाचा पाठलाग करत त्याला इमारतीच्या छतावर गाठले. त्यानंतर कोयत्याने वार करीत त्याचा खून केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांना अटक झाली आहे. त्यांची नावे समजू शकली नाही.

हे सुद्धा वाचा

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ आणि आरोपींमध्ये वाद होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. आरोपींनी त्याला एकटे गाठत सपासप वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पुण्यात कोयत्या गँग पुन्हा सक्रीय झाल्याचे या हल्लातून दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.