Pune ST Strike| स्वारगेट आगरातून अप्रशिक्षित खासगी चालकाच्या मदतीने ‘लालपरी’ धावली ; कर्मचारी आंदोलकांनी उचलेले मोठे पाऊल

बाहेरचे चालक आणवून एसटी गाड्या बाहेर काढल्या जात असल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. बाहेर निघत असलेल्या एसटीच्या समोर बसत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. ताणाशाही नही चलेगी म्हणत महामंडळाचा कृतीचा निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची फौज फाटाही तैनात करण्यात आला.

Pune ST Strike| स्वारगेट आगरातून अप्रशिक्षित खासगी चालकाच्या मदतीने 'लालपरी' धावली ; कर्मचारी आंदोलकांनी उचलेले मोठे पाऊल
Pune ST Strike

पुणे – पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका स्वारगेट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडं स्वारगेट आगारातून अखेर लालपरी बाहेर पडल्याने महामंडळ व एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नसला तरी करार तत्वावरील खासगी चालकांच्या मदतीने एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.  त्यानुसार आगारातून आज पाहिली एसटी बाहेर पडली. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आगार बाहेर पडत असलेली एसटी अडवत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. एसटी आगार बाहेर काढली जात आहेत असे म्हणताचकर्मचारी आगारात जमा झाले.  त्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

आंदोलकांनी केले ठिय्या आंदोलन बाहेरचे चालक आणवून एसटी गाड्या बाहेर काढल्या जात असल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. बाहेर निघत असलेल्या एसटीच्या समोर बसत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. ताणाशाही नही चलेगी म्हणत महामंडळाचा कृतीचा निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची फौज फाटाही तैनात करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्याकडे चालक आणि वाहक पदाची जबाबदारी त्याच कर्मचाऱ्यांनी एसटी चालवली पाहिजे. कर्मचारी आंदोलन माघार घेत नसल्याने महामंडळाने वर्क शॉपमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी चालवली जात असल्याचा आरोप आंदोलकी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

नियमबाह्य वाहतूक आधीच कामगारांच्या आयुष्याशी राज्य सरकार खेळत आहे. आता वर्कशॉपमधील मॅकेनिकला चालक बनवत महामंडळ नियमबाह्य पद्धतीने एसटी वाहतूक करत प्रवाश्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलक कमर्चाऱ्यांनी केला आहे. एसटीची वाहतूक करणाऱ्या चालकांकडे बॅच , बिल्ला , तसेच वाहतूकीचा परवाना नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दरम्यान महामंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे.

प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ नको महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व महाविकास सरकारने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ करू नये अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. ज्या लोकांना प्रशिक्षण नाही त्यांच्याद्वारे एसटी चालवली जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर याला कोण जबाबदार राहणार अशी विचारणाही आंदोलकांनी केली आहे.

India Corona Update | देशात कोरोनाचा स्फोट, तब्बल 7 पटीने वाढ, दिवसभरात 1.42 लाख नवे रुग्ण, महाराष्ट्राची काय स्थिती ?

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Published On - 12:06 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI