AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopal Hari Deshmukh| पुण्यातील नगरवाचन मंदिरांचे प्रणेते ‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी

समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधली पाहिजे

Gopal Hari Deshmukh| पुण्यातील नगरवाचन मंदिरांचे प्रणेते 'लोकहितवादी' गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
Gopal hari Deshmukh
| Updated on: Feb 18, 2022 | 8:00 AM
Share

पुणे – समाजातील रूढी परंपरा ,अंधश्रद्धा दूर करून सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरणारे समाजसेवक म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (Gopal Hari Deshmukh)होय. पुण्यात(Pune) 18 फेब्रुवारी 1823 रोजी  त्यांचा जन्म झाला. लहानपानापासूनच वाचनाची विलक्षण आवड असलेल्या गोपाळराव यांचा इतिहास(history ) हा अत्यंत आवडता विषय होता. इतकेच नव्हेतर संस्कृत,फारसी,हिंदी,गुजरातीउत्तम ज्ञान त्यांना अवगत होते. 19 व्या शतकात मराठी शाळेत शिक्षण घेत असतानांच इंग्रजी विषयाचा अभ्यास त्यांनी केला. समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधली पाहिजे.असे त्यांना वाटायचे.अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा. वयाच्या 21व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून रुजू झाले, न्यायालयातील ‘मुन्सिफीची ‘ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत या साठीची त्यांची तळमळ होती.

दिशा देणारे लिखाण

मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक असलेल्या देशमुखांच्या बद्दल जाणून घ्या या खास गोष्टी लोकहितवादींचा इतिहास हा आवडता विषय होता, या विषयवार त्यांनी 10 पुस्तके लिहिली होती. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली.

गोपाळ यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले. पुढे हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले गेले. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे 39 ग्रंथ लिहिले.

लोकहितवादी हे हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले.

“मातृभाषेतून शिक्षण” या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केलाभारतखंड पर्व,पाणीपत ची लढाई,हिंदुस्थानाचा इतिहास,गुजरात देशाचा इतिहास,लंकेचा इतिहास,सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास,हे काही त्यांची साहित्ये आहेत.

पूना नेटिव जनरल लायब्ररीची स्थापना

पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले.दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना ब्रिटिश शासनाने राव बहादूर ही पदवी देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि राव बहाद्दूर या पदवीने गौरवान्वित केले.

( माहिती गुगलवरुन साभार )

Video: अब कपडे उतरेंगे तो सबके सामने, लॉक अपमध्ये कोणत्या सेलिब्रेटींचे कपडे उतरवणार कंगना रनावत?

ट्रकचा असा अपघात यापूर्वी तुम्ही कदाचित पाहिला नसेल; नेटकरी म्हणतात आत्म्याने शरीराचा त्याग केला!

Dombivali : काम होणार, आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल; एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदारांना काढला चिमटा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.