Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणची पोरं लई हुश्शार… निकाल किती टक्के लागला?; मुंबईचा निकाल काय?

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात कोकण विभागाने सातत्य राखले आहे. पण या विभागाला गड राखता आला नाही. गेल्यावर्षी सुद्धा कोकण विभागाने बाजी मारली होती.

कोकणची पोरं लई हुश्शार... निकाल किती टक्के लागला?; मुंबईचा निकाल काय?
कोकण विभागाने मारली बाजी
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 1:33 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला. राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीश यश मिळवले. ९ विभागीय मंडळांचा निकाल तसा जोरदार आहे. सर्व विभागीय मंडळांनी ९० टक्क्यांचा वर निकाल दिला आहे. पण कोकण विभागाने सरस निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे.

या तीन विभागांची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज निकाल जाहीर केला. त्यानुसार राज्याचा बारावीच्या निकाल ९३.३७ टक्के इतका लागला आहे. नऊ विभागीय मंडळापैकी कोकण विभागाने ९७,५१ टक्क्यांसह बाजी मारली. त्यानंतर नाशिक विभाग ९४.७१ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ९४.४४ टक्क्यांसह पुणे विभाग आहे.

इतके विद्यार्थी झाले उत्तीर्ण

इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण परीक्षार्थी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यातील 13 लाख 29 हजार 684 परीक्षार्थ्यांनी बाजी मारली. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अर्थात निकालात यंदा पण मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के इतका लागला आहे.

कुठे पाहणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज २१ मे २०२४ रोजी बारावीचा निकाल त्यांना ऑनलाईन पाहता येईल. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन शकता.

विभागवार  टक्केवारी

  • कोकण – ९७.५१
  • नाशिक – ९४.७१
  • पुणे- ९४.४४
  • कोल्हापूर- ९४.२४
  • छत्रपती संभाजीनगर- ९४.०८
  • अमरावती- ९३
  • लातूर – ९२.३६
  • नागपूर – ९२.१२
  • मुंबई-९१.९५

गेल्या पाच वर्षांतील निकाल

  1. वर्ष २०२० – ९०.६६ टक्के
  2. वर्ष २०२१ – ९९.६३ टक्के
  3. वर्ष २०२२ – ९४.२२ टक्के
  4. वर्ष २०२३ – ९१.२५ टक्के
  5. वर्ष २०२४ – ९३.३७ टक्के

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.