AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC 10th Result 2023 : राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के, पोरं हुश्शार की पोरी हुश्शार, संपूर्ण निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे.

SSC 10th Result 2023 : राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के, पोरं हुश्शार की पोरी हुश्शार, संपूर्ण निकाल जाणून घ्या एका क्लिकवर
ssc result Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2023 | 12:29 PM
Share

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे.

मार्चमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा. या परीक्षेत 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या निकालात नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 92.49 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाने 98.11 टक्के मिळवत बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

विभाग निहाय निकाल

पुणे 95.64% मुंबई 93.66% औरंगाबाद 93.23% नाशिक 92.22% कोल्हापूर 96.73% अमरावती 93.22% लातूर 92.66% नागपूर 92.05% कोकण 98. 11%

या अधिकृत संकेतस्थळांचे पाहता येईल निकाल

१. www.mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://ssc.mahresults.org.in

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी उद्यापासून अर्ज करा

दरम्यान, गुणांबाबत काही अडचण असल्यास गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येणारआहे. आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 3 ते 11 जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI Net Banking) द्वारे भरता येईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.