AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ठरलं ! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात?; आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. यावेळी कशा पद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा फॉर्म्युलाही समोर आला होता.

अखेर ठरलं ! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात?; आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 06, 2023 | 8:34 AM
Share

पुणे | 6 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेत एन्ट्री झाल्यानंतर लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा ऊर्वरीत विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण या विस्ताराचा मुहूर्त काही केल्या मिळत नव्हता. अखेर हा मुहूर्तही मिळाला आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. केंद्राने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल दाखवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या विस्तारात संधी मिळावी म्हणून इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेत पुढील आठवड्यात विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात हा विस्तार होणार असून या विस्तारात कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण हा विस्तार झाला नाही. आता अधिवेशनही संपलं आहे. तसेच निवडणुकांना 7 ते 8 महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

40 मिनिटं चर्चा

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शाह यांची जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलात भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची 40 मिनिटे चर्चा झाली. राज्यातील राजकीय घडामोडी आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे फॉर्म्युला

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. यावेळी कशा पद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा फॉर्म्युलाही समोर आला होता. नव्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार तर अजितदादा गटाला दोन मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा गट सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाची संख्या प्रचंड घटली आहे. त्यामुळे इच्छुकांना मंत्रिमंडळात कसे सामावून घ्यायचे? हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर प्रश्न आहे.

अनेकजण मंत्रीपद मिळेल म्हणून ठाकरे गट सोडून शिंदे यांच्यासोबत आले आहेत. तर काहीजण मंत्रिपद सोडून शिंदे यांच्यासोबत आले आहेत. तर काहींना आपण शिंदे यांच्यासोबत निष्ठावंत राहिलो आहोत, त्यामुळे आपला विस्तारात विचार व्हावा असं अनेकांना वाटत आहे. त्यामुळे शिंदे कुणाला मंत्रिपद देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....