AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021: टपाली मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांची धाकधूक वाढली

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: postal vote counting start in maharashtra)

Gram Panchayat Election Results 2021: टपाली मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांची धाकधूक वाढली
| Updated on: Jan 18, 2021 | 8:40 AM
Share

पुणे: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतमोजणीनंतर मशीनमधील मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या काही तासांत ग्रामपंचायत निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होणार आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: postal vote counting start in maharashtra)

कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी सुरू होईल. कराड तालुक्यात 240च्या आसपास टपाली मतदान आहे. या मतांची मोजणी झाल्यानंतर मशीनमध्ये मतमोजणी सुरू करण्यात येईल. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा जोर लावला होता. त्यामुळे कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काका विरुद्ध पुतण्या

पंढरपूरमधील अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात चुरस पाहताना दिसत आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती आहे सत्ता. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले आहे. येथील 17 जागां पैकी एक जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले आहे. त्यामुळे अकलूजच्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हातकणंगलेमध्ये मतमोजणीला सुरुवात

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मतदान अधिकारी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: postal vote counting start in maharashtra)

दरम्यान, राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: postal vote counting start in maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | सातारा, सोलापुरात मतमोजणीला सुरुवात

(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: postal vote counting start in maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.