Pune Metro | पुण्यातील ‘आयडियल कॉलनी’ व ‘बुधवार पेठ’ मेट्रो स्थानकांची नावे बदलणार ; काय असणार नवीन नावे

Pune Metro | पुण्यातील 'आयडियल कॉलनी' व 'बुधवार पेठ' मेट्रो स्थानकांची नावे बदलणार ; काय असणार नवीन नावे
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
Image Credit source: twitter

शहरात मेट्रो  रेल्वे  सेवा सुरु झाल्यानंतर पुणेकर नागरिकांनी आयडियल कॉलनी' व 'बुधवार पेठ', ‘भोसरी मेट्रो’ स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला होता. स्थानकांच्या नावानुसार संबंधित ठिकाण मेट्रो स्थानकांपासून बऱ्याच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडेल. असे सांगण्यात आले होते.

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 28, 2022 | 11:09 AM

पुणे – शहरात महामेट्रो प्रकल्पाचा (Maha metro ) पहिल्या टप्पयातील टप्पा सुरु झाला आहे. पुणेकर नागरिकांनाही मेट्रोच्या या सेवेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मट्रो स्थानकांपैकी महत्त्वाची स्थानके ओळखल्या जाणाऱ्या ‘आयडियल कॉलनी’ (Ideal Colony)व बुधवार पेठ’ (Budhwar Peth metro station) व ‘भोसरी मेट्रो’  स्थानकांच्या नावाला नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. या स्थानकांची नावे बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यानुसार बुधवार पेठ व आयडियल कॉलनी स्थानकाचे नाव बदलून अनुक्रमे कसबा पेठ व पौड फाटा केले जाण्याची शक्यता आहे. या संबधीचा प्रस्ताव राज्य सरकारसह केंद्राकडेही पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकांची नावे बदलण्याची आधीसूचना काढण्यात येणार आहे. मात्र जोपर्यंत प्रस्तावास मान्यता मिळत नाही तोपर्यंत नावे बदलता येणार नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

काय आहे आक्षेप

शहरात मेट्रो  रेल्वे  सेवा सुरु झाल्यानंतर पुणेकर नागरिकांनी आयडियल कॉलनी’ व ‘बुधवार पेठ’, ‘भोसरी मेट्रो’ स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला होता. स्थानकांच्या नावानुसार संबंधित ठिकाण मेट्रो स्थानकांपासून बऱ्याच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडेल. असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुखकर वाहतूक सेवेसाठी ज्या ठिकाणी मेट्रो स्थानक आहे, त्याच ठिकाणचे स्थानकाला नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. तसाच प्रस्तावही महामेट्रोक प्रशासनाला देण्यात आला होता.

भोसरी स्थानकाच्या नाव बदलण्याबाबत  प्रस्ताव नाही

पिंपरी-चिंचवडामधील भोसरी स्थानकाच्या नावालाही याच प्रकारे आक्षेप घेण्यात आला होता. भोसरी मेट्रो स्थानकांच्या नावावरून नागरिकांचा गोंधळ उडत आहेत. नावाप्रमाणे मेट्रोचा त्या परिसरात थांबा नाही. मेट्रोचा स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास 10 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात अडचणी येणार आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र भोसरी स्थानकाचे नाव बदलण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Osmanabad | सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एके काळी काँग्रेसमध्ये होते, भान राखावं, अशोक चव्हाणांकडून कानउघडणी

Pune PMC | पुण्यात महापालिकेतील राजकीय दलाने, कार्यालयांना ठोकले टाळे ; विकास कामांची होणार चौकशी

Pune Crime| आंबेगाव तालुक्यात भर तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचावर कोयत्याने हल्ला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें