Pune Crime| आंबेगाव तालुक्यात भर तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचावर कोयत्याने हल्ला

संतोष राजगुडे यांनी जुन्या बोरवेलच्या पाण्याच्या वाटपाचा राग मनात धरून तलवारीने हा जीवघेणा हल्ला करत वार केले. या घटनेत सरपंच पोखरकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune Crime| आंबेगाव तालुक्यात भर तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचावर कोयत्याने  हल्ला
तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचावर कोयत्याने हल्ला Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 2:57 PM

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात (Ambegaon )धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव पीर येथे गावच्या सरपंचावर भर यात्रेत जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंच (Sarapanch )गंभीररित्या जखमी झाले आहेत. संजय पोखरकर असे जखमी सरपंचांचे नाव आहे. गावातील यात्रेचा उत्सव सुरू आहे. यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या तमाशाच्या कार्यक्रमावेळी पोखरकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. संतोष राजगुडे यांनी जुन्या बोरवेलच्या पाण्याच्या वाटपाचा राग मनात धरून तलवारीने हा जीवघेणा हल्ला करत वार केले. या घटनेत सरपंच पोखरकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ निर्मण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. पोलीस (Police) घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नेमक काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव पीर गावात घटनेच्या वेळी लोककलावंत मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा चालू होता. याच दरम्यान तमाशाच्या स्टेजवर पीडित सरपंच मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी गेले होते. मान्यवरांचा सत्कारकरून खाली परत आल्यानंतर साधारण 50  मीटर अंतर चालून गेले असतील तेवढ्यात आरोपीने सरपंच पोखरकर यांच्यावर मागून लोखंडी कोयत्याने वर केला. पीडित संरपंच मागे वळून बघेपर्यंत संतोष याने दुसरा वार टाळु व कपाळावर केला. संतोष याने तिसरा वार केला तेव्हा पीडिताच्या बरोबर असलेल्या सावळेराम फकिरा अदक यांनी त्यांचा डावा हात मध्ये घालाट तो वार हातावर झेलला. यामध्ये डाव्या हाताच्या तळहातावर लागून त्यांना जखम झाली. एवढ्यावरच न थांबता संतोषने केलेला चौथा वार चुकवण्यासाठीपोखर कर यांनी उजवा हात मध्ये घातला. तो वार माझ्या मनगटावर लागून तेथे त्यांना जखम झाली आहे.

जुन्या रागातून हल्ला

पीडित सरपंच पोखरा कर व आरोपी संतोष कचरू राजगुडे यांच्यात सामाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपाच्या कारणावरून वादावादी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून संतोष राजगुडे याने हल्ला केल्याची माहिती पीडिताने आपल्या फिर्यादीत दिली आहे. घटनेतील आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यत दिले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं

Star Pravah Parivar Puraskar 2022: सोहळ्यात सासू- सुनांचा दिसणार अनोखा अंदाज

नाशिकमध्ये तब्बल 318 रुग्णालयांचे फायर ऑडिटच नाही; महापालिका कधी कारवाई करणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.