Rain : राज्यात पाऊस आजपासून परतणार, या जिल्ह्यांना दिला अलर्ट

Weather Update : राज्यात तीन, चार दिवसांपासून दांडी मारलेला पाऊस आता परतणार आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

Rain : राज्यात पाऊस आजपासून परतणार, या जिल्ह्यांना दिला अलर्ट
IMD weather UpdateImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 8:47 AM

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. आता आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये रुसून बसलेला मान्सून सप्टेंबरमध्ये पुन्हा परतला. सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तीन, चार दिवस पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा १४ सप्टेंबरपासून मान्सून सक्रीय होत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे मान्सून सक्रीय झाला आहे.

पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यात पाऊस

राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील काही तासांत याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय होईल आणि राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि कोकणात 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा झालेला नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणार पाूस आणि परतीचा पाऊस महत्वाचा ठरणार आहे. या पावसावरच राज्यातील पुढील रब्बी हंगामाने भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात असा पडणार पाऊस

कोकणात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान तर मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.