छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी उदयनराजे नतमस्तक

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी आले. (Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj)

अनिश बेंद्रे

|

Apr 12, 2021 | 8:14 AM

पिंपरी चिंचवड : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी बलिदानस्थळाचे दर्शन घेतले. पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे असलेल्या समाधीस्थळी छत्रपती उदयनराजे भोसले नतमस्तक झाले. (MP Udayanraje Bhosale visits Vadhu on Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary)

बलिदानस्थळी अभिवादन

भाजपचे राज्यसभा खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी आले. सुरुवातील समाधी स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी दर्शन घेऊन अभिवादन केले. छावा, धर्मवीर, संस्कृत पंडित, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही छत्रपती संभाजी महाराज यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

रायगडवरील उत्खननात मिळाली मौल्यवान बांगडी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर सध्या उत्खननाचं काम सुरु आहे. आतापर्यंत गडावरील उत्खननात मौल्यवान वस्तू, भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं मिळाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उत्खननात सोन्याची एक पुरातन मौल्यवान बांगडी मिळाली. त्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. संभाजीराजे यांनी या बांगडी आणि अन्य वस्तूंचे फोटोही ट्वीट केले.

उदयनराजेंची बॉक्सिंग बॅगसोबत पंचिंग

छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील जावळीमध्ये राहणारे आपले मित्र अजीजभाई मुजावर यांच्याकडे गेले होते. त्यावेळी घरातच असणाऱ्या जिममध्ये त्यांनी बॉक्सिंग बॅगबरोबर जोरदार पंचिंग केलं. एका तरुणाने पंचिंग बॅग धरली, तर उदयनराजेंनी त्यावर हात साफ केला. त्यानंतर त्याच्याकडे लूक देत ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’ असा डायलॉगही उदयनराजेंनी मारला. त्याचप्रमाणे करेल फिरवून दंड मारत आपण स्वतः फिट असल्याचंही उदयनराजेंनी दाखवून दिलं.

संबंधित बातम्या:

रायगडवरील उत्खननात मिळाली मौल्यवान बांगडी आणि पुरातन वस्तू, संभाजीराजेंची माहिती

आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी

VIDEO | उदयनराजेंची बॉक्सिंग बॅगसोबत पंचिंग, म्हणतात ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’

(MP Udayanraje Bhosale visits Vadhu on Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें