‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. (Mumbai Pune expressway Two accident)

'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर दोन विचित्र अपघात झाले आहेत. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. या अपघातांमुळे वाहतुकीवर परिणाम निर्माण झाला आहे. (Mumbai Pune expressway Two accident)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसजवळील फूड मॉल जवळ एक अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

हे दोन्ही अपघात खोपोली हद्दीत झाला आहे. त्यानंतर IRB यत्रंणा, वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम घटनास्थळी मदत कार्यासाठी पोहोचली आहे.

त्यानंतर वाहतूक यंत्रणेकडून तातडीनं पावलं उचलण्यात आल्याने सद्यस्थितीत हा मार्ग सुरळीत सुरू करण्यात आला आहे.(Mumbai Pune expressway Two accident)

संबंधित बातम्या : 

रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल

कल्याणमध्ये कुख्यात गुंडाने पोलिसांवर कुत्रे सोडले, एक तासाच्या थरारानंतर गुंडाला अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI