AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांचा मेंदू मर्यादीत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं?’, शरद पवार यांची कुणावर खोचक टीका?

भाजपच्या एका नेत्याने शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संबंधित नेत्यावर खोचक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घडामोडींविषयी सुद्धा माहिती दिली.

'त्यांचा मेंदू मर्यादीत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं?', शरद पवार यांची कुणावर खोचक टीका?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 27, 2024 | 7:51 PM
Share

पुणे | 27 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध भागातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. जनतेची नेमकी काय भावना आहे ते त्यांनी जाणून घेतलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर, त्यांच्यावर सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं शरद पवार यांच्यासोबत नातं जोडलं जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. विशेष म्हणजे एका नेत्याने शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संबंधित नेत्यावर खोचक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घडामोडींविषयी सुद्धा माहिती दिली.

शरद पवार यांची खोचक टीका

भाजप नेते आशिष देशमुख यांनी शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हसत उत्तर दिलं. “आमच्यावर अशी इतकी वेळ आली?” असा उलटप्रश्न शरद पवारांनी केला. “कोण म्हटलं?”, असा प्रश्न शरद पवार यांनी केला. त्यावर पत्रकारांनी आशिष देशमुख यांचं नाव सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनी आशिष देशमुखांवर टीका केली. “त्यांना मेंदू मर्यादीत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं?”, अशी टीका शरद पवारांनी केली.

शरद पवार यांचं प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचं आवाहन

“राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आम्ही सर्वांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इतरांसोबतसुद्धा आमची सुरु आहे. एकत्रित येऊन भाजप विरोधात पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानेदेखील सहभागी व्हावं. अंतर्गत चर्चा करण्यासाठी आजच बैठक होती. त्या बैठकीत काय झालं याची माहिती मला नाही. कारण मी इथे आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचे काही सहकारी बोलले. त्यांच्याकडून सुचवलं गेलं की, आजच्या दिवशी पुण्याला जाहीर सभा आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत चर्चा करायला येऊ शकले नाहीत. त्यांच्यासोबतची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

‘आम्ही अन्य पक्षांसोबत एकत्रित बसण्याचा निर्णय योग्य’

“लोकांना पर्याय हवा आहे. आम्ही सकाळपासून बारामती लोकसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधतोय. प्रत्येक मतदारसंघाचे कमीत दीडशे-दोनशे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सर्व एकत्रित आहेत. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे, अशी माहिती आमच्या सहकाऱ्यांकडून मिळाली. ही जनतेची इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची ती पूर्ण करायची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही अन्य पक्षांसोबत एकत्रित बसण्याचा निर्णय योग्य आहे”, असं शरद पवार म्हणाले.

‘दमाटीला घाबरु नका’, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

“अनेकांनी सांगितलं की, काही लोकांकडून दमदाटीचे फोन येत आहेत. काही निमशासकीय कर्मचारी उदारणारी शिक्षण संस्थेत किंवा सरकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीवरुन मुकावं लागेल, अशाप्रकारची धमकी दिली जातेय, असं लोकांनी सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की, प्रत्यक्ष असं घडलं असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही खोलापर्यंत जाऊ. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छितो. कुणी दमदाटी केली, कुणी दबाव टाकण्याता प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण त्या कार्यकर्त्याच्या पाठिशी आहोत. तुम्ही काही चिंता करु नका. तुम्ही एकटे नाहीत”, अशा विश्वास शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं