आता परमेश्वर तरी मदतीला येतो का? हे ते पाहत आहेत; हसन मुश्रीफांचा भाजपला खोचक टोला

भाजपने मंदिरं सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे. (ncp leader hasan mushrif attacks bjp over temple agitation)

आता परमेश्वर तरी मदतीला येतो का? हे ते पाहत आहेत; हसन मुश्रीफांचा भाजपला खोचक टोला
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

कोल्हापूर: भाजपने मंदिरं सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारच्या विरोधात सातत्याने काही ना काही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता परमेश्वर तरी मदतीला येतो का हे ते पाहत आहेत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. (ncp leader hasan mushrif attacks bjp over temple agitation)

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. केंद्र सरकार, नीती आयोग आणि तज्ज्ञ देखील कोरोनावरून सातत्याने इशारा देत आहेत. काळजी घ्या म्हणून वारंवार सांगत आहेत. तरीही भाजप आंदोलन करून गर्दी जमवत आहे. सरकारच्या विरोधात सातत्याने काही ना काही करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आता परमेश्वर तरी मदतीला येतो का हे ते पाहत आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

सरकार अस्थिर करण्याचे वेगवेगळे प्रयोग

शिवसेना नेते अनिल परब यांना आलेली ईडीची नोटीस आणि खासदार भावना गवळी यांच्या घरावर पडलेली धाड यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग भाजपकडून सुरू आहेत. पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अनिल परब यांना नोटीस कशी निघू शकते? भाजपला झोप लागत नाहीये. सत्तेसाठी ते कासावीस झाले आहेत, असं सांगतानाच भावना गवळी या सत्तेत होत्या. मंत्री होत्या. आता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. हे बरोबर नाही. जनताच भाजपला चोख उत्तर देईल, असं ते म्हणाले.

म्हणून स्वबळावर लढणार

स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पक्ष जागरूक असला पाहिजे. संघटना मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. पक्ष विस्ताराचा सर्वांना अधिकार आहे, असं त्यांनी सांगितलं. 2024 ला एकाच पक्षाच सरकार असेल असं संजय राऊत नाशिकमध्ये म्हणाले होते. त्यावर मुश्रीफ यांना विचारलं असता, ते सरकार आमच असेल असं मी म्हणतोय, असा दावा त्यांनी केला.

उद्धवजी होश मे आओ

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मान नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असं आवाहन पाटील यांनी केलं.

भाजप शासित राज्यात मंदिरे उघडली का?

मंदिर उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपने मंदिरे उघडी करण्यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. मंदिरं इतर राज्यात उघडली आहे का पाहा. विशेषत: भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मंदिरं उघडली का ते पाहा आधी. हिंदुत्ववादी केद्रांतल सुद्धा सरकार आहे असं आम्ही मानतो. त्यांनाही चिंता आहे, पण तेच काळजी घ्या म्हणून सांगत आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला. (ncp leader hasan mushrif attacks bjp over temple agitation)

 

संबंधित बातम्या:

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंची खोचक टीका

शुद्धीवर येऊन बोला, मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश केंद्राचेच; विजय वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले

तर कुलूप तोडून लोक मंदिरं सुरू करतील; चंदक्रांत पाटील यांचा आघाडी सरकारला इशारा

(ncp leader hasan mushrif attacks bjp over temple agitation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI