राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट; चाकणकरांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. (NCP women leaders protest against inflation in all over maharashtra)

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट; चाकणकरांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन
rupali chakankar

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत. (NCP women leaders protest against inflation in all over maharashtra)

रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवत देशातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती. याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अच्छे दिनाची खोटी स्वप्नं दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे प्रतिक म्हणून शेणाच्या गोवऱ्या महिलांनी राज्यभरातून भेट म्हणून पाठवल्या आहेत, असं चाकणकर यांनी सांगितलं.

‘चुलीकडे चला’ म्हणण्याची वेळ आली

महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या पंतप्रधानांनी उज्वला गॅस योजना आणली. परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर 15 दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली, त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा संताप चाकणकर यांनी केला आहे.

क्या हुआ आपका वादा

सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल – डिझेल दरवाढ करून केंद्रसरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे त्या म्हणाल्या. सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, आज देशभरातील महिला भगिनी आपल्याला विचारतात, “क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

गॅस सिलिंडर 9 महिन्यांत 190 रुपयांनी महागला

एलपीजीचे नवे दर बुधवारी जाहीर करण्यात आलेत. सप्टेंबरच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झाली. 18 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली. 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली. (NCP women leaders protest against inflation in all over maharashtra)

 

संबंधित बातम्या:

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी, कवितेतून मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या कृषीकन्येला आदित्य ठाकरेंचं मोठं गिफ्ट

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

(NCP women leaders protest against inflation in all over maharashtra)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI