AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NDRF च्या मदतीचे देशातच नव्हेत परदेशातही होतेय कौतुक – गृहमंत्री अमित शहा

देशसेवेसाठी तुम्ही देत असलेल्या अतुलनीय निष्ठेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आपल्या कर्तव्य दक्षतेमुळं NDRF ने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे

NDRF च्या मदतीचे देशातच नव्हेत परदेशातही होतेय कौतुक - गृहमंत्री अमित शहा
NDRF Program
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 5:49 PM
Share

पुणे – पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी तळेगांव दाभाडे जवळील सदुंबरे येथील NDRF च्या कॅम्पला भेट दिली. यावेळी अडचणीत सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवण्याची तुमची तत्परता व समर्पण यामुळे एनडीआरएफ कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ येताच सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. देशसेवेसाठी तुम्ही देत असलेल्या अतुलनीय निष्ठेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आपल्या कर्तव्य दक्षतेमुळं NDRF ने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे. त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तुम्ही केवळ भारताच नव्हे तर नेपाळ, जपान यासारख्या देशातही तुम्ही आपल्या कामाची छापा सोडून आलात, तुमचे काम हे संबंध मानवजातीच्या प्रती असलेले संवेदन व समर्पण कौतुकास्पद आहे.

एनडीआरएफला अधिक कार्यक्षम करणारा येत्या काळात केंद्र सरकार एनडीआरएफला अधिक कार्यक्षम, उत्तम संसाधनांनी सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहे. आता वेळ आली आहे एसडीआरएफला एनडीआरएफच्या बरोबरीने बनवण्याची. एवढ्या मोठ्या देशात आपत्तीच्या वेळी जनतेला वाचवण्यासाठी NDRF आणि SDRF यांच्या एकत्रित प्रशिक्षणावर आणि सरावावर आपण भर दिला पाहिजे.असेही शहा म्हणाले.

प्रत्येक राज्यात फॉरेन्सिक सायन्सचे कॉलेज उभे रहावे सर्व राज्य सरकारांनी फॉरेन्सिक सायन्सचे एक महाविद्यालय करावे आणि ते फॉरेन्सिक सायन्स कॉलेज विद्यापीठाशी संलग्न करण्यात यावे जोडावे.आतापर्यंत चार राज्यात या कॉलेज उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. इतर अनेक राज्यांच कॉलेज उभारण्याबाबतचे प्रस्तावही आलेले आहेत. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही यावर गांभीर्याने विचार आहे. ज्या दिवशी ही फॉरेन्सिक सायन्सची महाविद्यालये सर्व राज्यांमध्ये सुरू होतील, तेव्हा देशात या क्षेत्रात कुशल जागतिक मानव संसाधनाची कमतरता भासणार नाही.असे मत शाह यांनी व्यक्त केले.

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार

Car Accident | अक्सा बीचजवळ कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.