‘आतापर्यंत कुठल्याच झोपडपट्टीवर अशी कारवाई नाही’, निलम गोऱ्हे आंबील ओढ्याप्रकरणी आक्रमक

'आतापर्यंत कुठल्याच झोपडपट्टीवर अशी कारवाई नाही', निलम गोऱ्हे आंबील ओढ्याप्रकरणी आक्रमक

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज (29 जून) पुण्यातील एसआरएच्या कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 29, 2021 | 10:49 PM

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज (29 जून) पुण्यातील एसआरएच्या कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली. तसेच आंबील ओढ्यातील अतिक्रमण कारवाईची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत आंबील ओढा परिसरातील काही नागरिक देखील उपस्थित होते. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली (Neelam Gorhe visit SRA office regarding action against Ambil Odha in Pune).

निलम गोऱ्हे म्हणाल्या, “आंबील ओढ्यात जी काही अतिक्रमणविरोधी कारवाई झाली त्याची चौकशी राज्य सरकार करत आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने कुठल्याच झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली नाही. परंतु ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली त्याबद्दल खेद आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या कारवाईच्या पाठीमागे कोण आहे याचे उत्तर काळ लवकरच देईल.”

निलम गोरे यादेखील बुधवारी आंबील ओढा परिसरात नुकसानग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, मविआ सरकारमधील ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी आज पुण्यात आंबील ओढा झोपडपट्टी विषयावर निलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी निलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत रमेश बागवे, मोहन जोशी व अभय छाजेडही होते. निलम गोऱ्हे यांनी नितीन राऊत यांना यावेळी पुस्तके भेट दिले.

हेही वाचा :

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या

आंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

व्हिडीओ पाहा :

Neelam Gorhe visit SRA office regarding action against Ambil Odha in Pune

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें