AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Water connection : पुढचे काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन, पुणे महापालिकेचा निर्णय; काय कारण? वाचा सविस्तर

पीएमसी पाणीपुरवठा विभागाने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना तत्काळ मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानग्या थांबवण्याच्या शक्यतेबद्दल कळवले आहे. या महिन्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.

PMC Water connection : पुढचे काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन, पुणे महापालिकेचा निर्णय; काय कारण? वाचा सविस्तर
पुणे महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 08, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) मालमत्तांना नवीन पाणी जोडण्यांना परवानगी देणे तात्पुरते थांबवण्याचा विचार करत आहे. 23 गावांच्या विलीनीकरणानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याची कमी झालेली उपलब्धता आणि वाढती मागणी पाहता, महापालिकेने यासंबंधी विचार केला आहे. शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या चार धरणांतील पाणीसाठा नऊ टीएमसीने खाली आला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात 11 टीएमसी होता. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पिण्याच्या गरजांसाठीच पाणी आरक्षित आहे. पाऱ्याची पातळी वाढल्याने आणि शहराच्या हद्दीचा विस्तार यामुळे वापरात वाढ झाल्यामुळे पाण्याची संभाव्य टंचाई (Shortage) अपेक्षित होती, असे नागरी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या पाण्याची टंचाई शहराला जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका विविध स्तरावर उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून हा विचार करण्यात आला आहे.

तापमान वाढ-पाण्याच्या वापरात वाढ

ते पुढे म्हणाले, की पीएमसी पाणीपुरवठा विभागाने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना तत्काळ मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानग्या थांबवण्याच्या शक्यतेबद्दल कळवले आहे. या महिन्याच्या अखेरीस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल. दरवर्षी, मागणी पूर्ण करण्यासाठी नागरी संस्था 15-20 टक्‍क्‍यांनी जास्त पाणी वापरत असल्याने शहरात पाण्याचा वापर वाढतो. यंदा गेल्या महिन्यापासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने शहरात पाण्याचा वापर अधिक होत आहे. सध्याची गरज पूर्ण करण्यासाठी पीएमसीला 1,600-1,700 एमएलडी पाणी खेचावे लागेल जे मागील वर्षी 1,250-1,300 एमएलडी होते.

पुरवावे लागतेय प्रक्रिया केलेले पाणी

पुणे महापालिका आतापर्यंत जलकुंभातून थेट लगतच्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत होती, परंतु आता शहराच्या नव्याने समाविष्ट झालेल्या भागात नागरिकांना प्रक्रिया केलेले पाणी पुरवावे लागत आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच पीएमसीला नव्याने विलीन झालेल्या गावांतील नागरिकांना पुरेसे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेमके काय होणार, हे पाहावे लागणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार