… तर मी मिशा काढेन!! नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांना कोणतं चॅलेंज दिलं होतं?

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 4:25 PM

पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

... तर मी मिशा काढेन!! नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांना कोणतं चॅलेंज दिलं होतं?
Image Credit source: social media

रणजित जाधव, पुणेः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्याबद्दल सांगितलेला एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. धारुभाई अंबानी आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये एक पैज (Challenge) लागली होती. ती हरलो तर मी माझ्या मिशा काढून टाकीन, असा दावा नितीन गडकरी यांनी केला होता. दोन वर्षांच्या आता गडकरी यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आणि धीरुभाई अंबानी यांनी आपण हरल्याचं कबूल केलं, हा प्रसंग नितीन गडकरी यांनी आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला. पिपरी चिंचवडमध्ये एका खासगी विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काय सांगितला किस्सा?

पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग बनवण्यासाठीची 3600 करोड रुपयांची निविदा धुरुभाई अंबानी यांनी भरली.

त्यांना नियमानुसार निविदा मिळायला हवी होती. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग 1800 करोड रुपयात होईल असं मला वाटलं… त्यामुळं त्यांच्या टेंडरवर मी सही केली नाही आणि ते टेंडर रद्द झालं. नाराज झालेल्या धीरूभाई यांनी एवढ्या कमी पैशांमध्ये द्रुतगती मार्ग होऊ शकत नाही असं म्हणताच मी त्याच पैशांमध्ये द्रुतगती मार्ग करेल… आणि माझ्याकडून नाहीच झाला तर मी मिशा काढून टाकेन… असं चॅलेंज नितीन गडकरी यांनी धीरूभाई अंबानींना दिलं होतं..

चॅलेंज कोण जिंकलं?

नितीन गडकरी यांनी सांगितलं.. तो रस्ता दोन वर्षात पूर्ण झाला. धीरूभाई अंबानी यांनी मी हरलो असं म्हणत मान्य केल्याचंही गडकरी यांनी सांगितलं..

पुण्यातल्या प्रदुषणावर काय म्हणाले?

पुण्यातील हवामान प्रदूषित झाल्याचं खुद्द केंद्रीमंत्री नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितलं. तसंच याबद्दल चिंताबी व्यक्त केली. पुण्यातल्या वातावरणाबद्दल ते म्हणाले,  पूर्वी पुण्यात शुद्ध हवा होती. पुणे शहर छान होतं. पण, आता वाहतूक कोंडी आहे. हवा प्रदूषित झाली आहे. हे सांगत असताना त्यांची बहीण पुण्यात राहत होती त्यामुळे पुण्यात यायचो अस गडकरींनी सांगितले..

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI