Pune water supply : पुण्यात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी? इथे वाचा…

जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी (Water duct) मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा बंद (Cut) ठेवण्यात येणार आहे.

Pune water supply : पुण्यात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी? इथे वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 4:53 PM

पुणे : पुण्यात उद्या काही भागात पाणीपुरवठा (Pune water supply) बंद राहणार आहे. दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. तर 13 तारखेला सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. घोरपडी, डिफेन्स, कॅम्प, सोमवार पेठ, जुना बाजार, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ रस्ता या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी (Water duct) मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा बंद (Cut) ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. 12) हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर येत्या शुक्रवारी (ता. 13) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मागील आठवड्यातही होता पाणीपुरवठा बंद

वडगाव जलकेंद्र तसेच विमाननगर आणि धानोरी टाकी येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी (5 मे) करण्यात आली होती. त्यामुळे या जलकेंद्र आणि टाक्यांवर अवलंबून असलेल्या काही भागांचा पाणीपुरवठा मागील गुरुवारी बंद ठेवण्यात आला होता, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

पाणीटंचाईने आधीच पुणेकर हैराण

अनेक भागात पाणीटंचाई आहे. इतकेच काय, रहिवासी आता या समस्येसाठी 24×7 समन्यायी पाणीपुरवठा योजनेला जबाबदार धरत आहेत. अलीकडे, विविध भागांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे रहिवाशांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही 2021पेक्षा कमी पाणी नोंदवले गेले, ज्यामुळे टंचाई निर्माण झाली आणि महापालिकेतील गैरव्यवस्थापन अधोरेखित झाले. पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने प्रचंड नाराजी पसरली असून लोक त्रस्त झाले आहेत. बाहेरून पाणी आणावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Non Stop LIVE Update
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.