Pune : पुण्यातल्या पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं, विविध वयोगटाच्या अभ्यासातून बाब उघड

सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे अभ्यासात समोर आले आहे.

Pune : पुण्यातल्या पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं, विविध वयोगटाच्या अभ्यासातून बाब उघड
मानसिक आरोग्य, प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 8:30 AM

पुणे : प्रत्येक पाच व्यक्तींपैकी चार व्यक्तांना मानसिक आरोग्याच्या समस्येने (Mental health issue) ग्रासले आहे. सुमारे 80 टक्के रहिवाशांना मानसिक आरोग्याची समस्या जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवर आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (Aditya Birla Education Trust) पुढाकाराने अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचे याविषयी सर्वेक्षण केले. यात ही बाब उघड झाली आहे. पुण्यातील 85 टक्के स्त्रिया आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि नैराश्य हे स्त्रियांमध्ये सर्वात मोठे कारण आहे. तर चिंता आणि पॅनिक डिसऑर्डर हे पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. एमपॉवर (Mpower) पुणे मेंटल हेल्थ स्कोअरने 18 ते 24 वर्षे वयोगटातील (युवक आणि किशोरवयीन) 25 ते 40 वर्षे (प्रौढ आणि कार्यरत लोकसंख्या) आणि 60 वर्षे आणि त्यावरील (वृद्ध लोकसंख्या) निष्कर्षांचे मूल्यांकन केले.

‘दुर्लक्ष करता येणारा विषय नाही’

नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्षा, डॉ. नीरजा बिर्ला म्हणाल्या, की एमपॉवर येथे आम्ही भारतातील मानसिक आरोग्याच्या चिंतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, गरजू लोकांना मदत आणि सेवा मिळविण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. शहर-विशिष्ट मानसिक आरोग्य स्कोअरच्या लाँचद्वारे आम्ही प्रत्येकाला हे लक्षात आणू इच्छितो, की मानसिक आरोग्य आता दुर्लक्ष करता येणारा विषय नाही. मानसिक आरोग्याचा त्रास कोणत्याही वयोगटातील आणि आजूबाजूला कोणालाही होऊ शकतो.

‘वेळीच योग्य समुपदेशन हवे’

सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.या त्रासाला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे मान्य करणे आणि योग्य व्यावसायिक मदत घेणे म्हणजेच समुपदेशन हा होय. कारण मानसिक आरोग्याच्या समस्यांसह जगणे केवळ एखाद्याच्या आनंदाचे जीवनच नकारात्मक नाही करत तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कारण या बाबी अप्रत्यक्षपणे उत्पादकता आणि वाढीस बाधित करतात, असे बिर्ला म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘मानसिक आरोग्याच्या समस्येने तरुणांना ग्रासले’

या सर्वेक्षणातून आणखी काही बाबी समोर आल्या आहेत. जसे की, 18 ते 24 वयोगटातील 88 टक्के तरूण मानसिक आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. पुण्यातील तरुणांमध्ये दिसणाऱ्या काही प्रमुख मानसिक आरोग्यावरील ताण म्हणजे मूड डिस्टर्बन्स आणि चिंता. अनेकांना पॅनिक डिसऑर्डर, अस्थिरता, गैरवर्तन आणि खुल्या नातेसंबंधांच्या समस्यांचा त्रास होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.