Corona |कोरोनाच्या नवीन नियमावलीबाबत ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी ; काय आहे मागणी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन कडून करण्यात येणार आहे.

Corona |कोरोनाच्या नवीन नियमावलीबाबत ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी ; काय आहे मागणी
Beauty parlor

पुणे- कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोरोनाची नवीन नियमावलीमध्ये लागू करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमावलीनुसार शहारातील 50 टक्के क्षमतेने सलून व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे ब्युटी पार्लर व्यवसाय चालू ठेवण्यास सरकारने घालून दिलेल्या नियमावलीबाबत ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

ऑनलाईन बैठक घेणार सलून बरोबरच ब्युटी पार्लर व्यावसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची आज दुपारी ऑनलाइन बैठक घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.

नवीन नियमावलीत बदल करा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन कडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार ही त्यांनी मानले आहेत. ग्राहकांनी तसेच सर्व सलून व ब्युटी पार्लर चालकांनी कोरोनाचे नियम पाळून स्वतःची व ग्राहकांची काळजी घ्यावी असे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहरतील ओमिक्रॉनची सद्यस्थिती शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्ये बरोबरच ओमिक्रॉन रुग्णाची संख्याही वाढत आहे. शनिवारी पुणे शहरात 118, पिंपरी चिंचवडमध्ये 8 आणि पुणे ग्रामीणमध्ये 3ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा गुरुवारी129 वर पोहोचला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

Health Care : कामापेक्षा जास्त जेवण केलं आहे? मग ‘या’ टिप्स फाॅलो करून आराम मिळवा!

Pimpri- Chinchwad crime| पिंपरीतील लष्करी वसाहत व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या ‘इतक्या’ झाडांची तस्करी

Published On - 10:38 am, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI