पंढरपुरात कोरोना रुग्ण आढळले, माघी सोहळा रद्द; 50 हजार भाविक परतीच्या मार्गावर

पंढरपुरात कोरोना रुग्ण आढळले, माघी सोहळा रद्द; 50 हजार भाविक परतीच्या मार्गावर
Pandharpur Yatra

पंढरपुरात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह 44 रुग्ण आहेत. त्यामुळे विठ्ठलाचा होणार माघी सोहळा प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे

Nupur Chilkulwar

|

Feb 21, 2021 | 3:45 PM

पंढरपूर : पंढरपुरात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह 44 रुग्ण आहेत. त्यामुळे विठ्ठलाचा होणार माघी सोहळा (Pandharpur Magh Sohla Cancel) प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. शनिवारी पंढरीत 70 ते 80 हजार भाविक दाखल झाले होते. मात्र, पोलिसांकडून प्रत्येक मठात नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळी पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 50 हजार भाविकांनी परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे पंढरीत आता आठ ते दहा हजार भाविक असण्याची शक्यता आहे (Pandharpur Magh Sohla Cancel).

ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आव्हानाला वारकरी संप्रदायाने अल्पशा प्रतिसाद दिला आहे. त्यामधील मठामध्ये चार ते पाच भाविक आहेत. त्यामध्ये वीणेकरी, टाळकरी असणारे भाविक आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला 80 ते 90 टक्के मठातील वारकर्यानि प्रतिसाद दिला असला तरी कोरोनाच्या बाबतीतल्या सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत.

Pandharpur Yatra

Pandharpur Yatra

वारकरी सांप्रदाय आक्रमक

माघा वारीतील संचारबंदीच्या मुद्द्यावरुन वारकरी सांप्रदाय आक्रमक होत आहे. जर मठातील वारकऱ्यांना संचारबंदी नावाखाली बाहेर काढलं तर शासनाच्या अंगलट येईल, असा इशारा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. आज गोल्फ कार्ट ई-व्हेईकलचा लोकार्पण सोहळा संत नामदेव पायरी जवळ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बंडातात्या कराडकर आले होते. त्यावेळी त्यांनी वारकरी बाहेर काढण्यावर नाराजी व्यक्त केली.

माघ एकादशीला वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊन गर्दी करु नये. यासाठी प्रशासनाने 23 फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस संचारबंदीचा आदेश काढला आहे. आता पोलिसांनी पंढरपुरातील मठात जे वारकरी आधीच येऊन राहिले आहे. अशा वारकऱ्यांना मठात न राहता आपापल्या गावी परत जाण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. आज मठात राहणाऱ्या वारकऱ्यांनी मठ खाली करावा, असे पोलीस मठ प्रमुखांना सांगत आहेत.

या मुद्द्यावरुन आता बंडातात्या कराडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारकरी जर मठात थांबून आपले भजन किर्तन करतील. संचारबंदीचा आदेश पाळतील. मठातून बाहेर पडणार नसतील तर मग त्यांना हुसकावून का लावत आहात, जर पोलिसांनी अशा पध्दतीने केले, तर हे सर्व शासनाच्या अंगलट येईल. वारकरी बाहेर येऊन त्याचा प्रक्षोभ होईल, असा इशारा बंडातात्या यांनी शासनाला दिला आहे.

Pandharpur Yatra

Pandharpur Yatra

पंढरपुरात एक दिवसाची संचारबंदी

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी माघी यात्रेच्या दिवशी पंढरपुरात एक दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा आहे. दरम्यान राज्यभरात पुन्हा कोरोना चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने माघी यात्रा रद्द केली असल्याची माहिती तहसीलदार सुशील वेल्हेकर यांनी दिली.

माघी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरासह जवळच्या वाखरी, टाकळी, इसबावी, कौठाळी, गोपाळपूर, शेगाव दुमाला, शिरढोण, गादेगाव, चिंचोली भोसे, भटुंबरे,आढीव, देगाव या गावात 22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचार बंदी लागू केली आहे.या दरम्यान शहर आणि परिसरातील मठामध्ये वारकऱ्यांना राहण्यास मज्जाव देखील करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लेखी आदेश दिला आहे (Pandharpur Magh Sohla Cancel).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीने 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्यण घेतला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर आणि परिसरातील 12 गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागू केला असल्याची माहिती तहसीलदार सुशील वेल्हेकर यांनी दिली.

Pandharpur Magh Sohla Cancel

संबंधित बातम्या :

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें