देव पावला! पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत महिन्याभरात 35 लाखांचं दान!

कोरोना संकटामुळे लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेले पंढरपूर येथील विठुरायाचे मंदिर तब्बल आठ महिने बंद होते.

देव पावला! पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत महिन्याभरात 35 लाखांचं दान!
Pandharpur Viththal Temple01
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 3:10 PM

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर (Vitthal Rukmini Temple) दर्शनासाठी खुले करुन (Donation In Just A Month) आज एक महिना पूर्ण झाला आहे. महिन्याभराच्या काळात राज्यासह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठुरायाचे मुख दर्शन घेतले आहे. याच दरम्यान, विठुरायाच्या दान पेटीत 35 लाख 50 हजार रुपयांचे दान जमा झाले आहे. मात्र, गेल्या वर्षी याच महिन्यात दोन कोटी इतके दान प्राप्त झाले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली (Donation In Just A Month).

कोरोना संकटामुळे लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेले पंढरपूर येथील विठुरायाचे मंदिर तब्बल आठ महिने बंद होते. सरकारी आदेशानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांना फक्त मुखदर्शनासाठी खुले केले होते. मंदिर सुरु होऊन आज एक महिना पूर्ण झाला.

गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनासाठी आसुसलेले भाविकही नियमांचे कोटेकोरपणे पालन करत पंढरीनाथाच्या चरणी लीन होत आहेत. महिन्याभराच्या काळात राज्यसह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन घेतले आहे. या काळात आषाढीसह कार्तिकी यात्रेचा सोहळाही प्रातिनिधिक स्वरुपात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तब्बल आठ महिने बंद असल्याने समितीला मिळणाऱ्या देणगीवर देखील मोठा परिणाम झाला होता.

याच काळात मंदिर समितीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना मदत देखील केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने येथील अर्थकारणही काही प्रमाणात सुरळीत होऊ लागले आहे.

Donation In Just A Month

संबंधित बातम्या :

पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!

PHOTO | कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

PHOTO | “लवकर लस येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे” उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विठ्ठलाला साकडं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.